शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेनेच्याच महिला कार्यकर्तीने भर रस्त्यात चोपलं

| Updated on: Mar 24, 2025 | 8:52 PM

कल्याण पश्चिमे येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवकला शिवसेना महिला कार्यकर्तीने भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली आहे. .या मारहाणीत माजी नगरसेवकाच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. नेमकी ही मारहाण का करण्यात आली?

शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेनेच्याच महिला कार्यकर्तीने भर रस्त्यात चोपलं
Former corporator of Shinde group was beaten up on the road by a female worker of Shiv Sena
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा वाद पेटला आहे. मात्र आता ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने भर रस्त्यावर चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाला असल्याचं म्हटलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेमध्ये ही घटना घडली आहे. राणी कपोते असं या महिलेचं नाव आहे. कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबूल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता. हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी पार पडला. या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत पार पडला.

रस्त्याचा कामाच्या श्रेयवादावरून वाद सुरु झाला

त्याठिकाणी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यासह महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. त्याठिकाणी कार्यक्रमासाठी शिवसेना महिला कार्यकर्त्या राणी कपोतेही पोहचल्या होत्या. यावेळी रस्त्याचा कामाच्या श्रेयवादावरून वाद सुरु झाला. कामाचा पाठपुरावा आपण केला, असा दावा राणी कपोते यांनी केली होता. त्यानंतर या ठिकाणी दोन्ही गटामध्ये जोरदार गोंधळ झाला. त्यावर माजी नगरसेवक उगले यांनी या कामाचा पाठपुरावा मी केला असल्याचा दावा केला. यामुळे काही काळ त्याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आणि हा वाद अखेर टोकाला केला.

भर रस्त्यात सर्वांसमोर त्यांनी उगले यांना चोप दिला

अहिल्याबाई चौकात राणी कपोते आणि मोहन उगले यांच्यात पुन्हा या विषयावरून वाद निर्माण झाला. तसेच यावेळी राणी कपोते यांनी ‘तू मला शिव्या का देतो? माझ्यासोबत गैरवर्तन का केलं?’ असं म्हणत उगले यांना थेट मारहाण करायला सुरुवात केली. भर रस्त्यात सर्वांसमोर त्यांनी उगले यांना चोप दिला. यात उगले यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राणी कपोते यांनी उगले यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.