पुणे : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुपाची जगाने धास्ती घेतली आहे. हा विषाणू आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा जास्त म्यूटेशन्स असलेला आहे. याच कारणामुळे देशात खबरदारी म्हणून वेगवेगळे उपाय केले जात आहेत. वेळीच काळजी घेतली नाही तर भारताला मोठा फटका बसू शकतो असे तज्ज्ञ सांगत आहेत. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असा सूचक इशारा दिलाय. कोरोनाच्या या नव्या रुपावर अँटीबॉडीजचाही काही परिणाम होणार नाही, असंदेखील त्यांनी म्हटलंय.
दक्षिण आफ्रिकेतून पसरलेला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हायरस चिंता वाढवणारा आहे. कोरोनाचे हे नवे रुप असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. हा विषाणू मोठ्या प्रमाणात आणि वेगानं पसरेल. त्यामुळे लोकांना संसर्ग होईल. या विषाणूवर अँटीबॉडीजचाही परिणाम होणार नाही. देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती होऊ शकते. या व्हेरियंटमध्ये 30 म्युटेशन आढळून आलेत. हाँगकाँग, बेल्जियम, इस्त्रायल या देशात हा विषाणू वेगानं पसरतोय, असे डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगिलं. तसेच हा विषाणू देशातील डेल्टापेक्षाही धोकादायक आहे. त्यामुळे काळजी घ्या. कोरोना नियम पाळा असे आवाहन भोंडवे यांनी केले.
दरम्यान, या नव्या विषाणूचा संसर्ग पाहता राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे. ठराविक विमानसेवा बंद करण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं थांबवायला हवी. परिस्थितीबाबतची माहिती केंद्राला दिली आहे. देशात ह्या प्रकारचा व्हेरिएंट सापडलेला नाही. आफ्रिकेच्या भागातून येणाऱ्यांसाठी 72 तासांची आरटीपीआर टेस्ट अनिवार्य आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं पूर्णतः बंद करायला पाहिजेत, असे आरोग्यमंत्र राजेश टोपे यांनी सांगितले.
आफ्रिकेतून येणाऱ्यांसाठी निगेटिव्ह आरटीपीसीआर बंधनकारक असेल. नमुने तपासण्याचं काम सुरु आहे. विमान प्रवास करुन आलेल्यांची कोरोना तपासणी सुरु करण्यात आलीय. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांचं स्क्रिनिंग सुरु आहे.
इतर बातम्या :