राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वीच विविध पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरू होतं. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर तर विजयी झालेल्या महायुतीमध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी -माजी नेत्यांची झुंबड उडाली. गेल्या अनेक महिन्यांपासून तर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटात अनेकांचे प्रवेश झालेले दिसत आहेत. त्यातच आता आणखी एक अपडेट समोर आली असून भारतीय जनता पक्षामध्ये माजी आमदाराचा पक्षप्रवेश होणार आहे. गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार आणि अभ्यूदय बँकेचे संस्थापक सिताराम धनदाट आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिताराम घनदाट आपल्या समर्थकांसह आज मुंबई येथे भाजप मध्ये प्रदेश करणार आहे. घनदाट यांच्या प्रवेश सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सिताराम घनदाट याच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाला परभणी जिल्ह्यात मोठा बळ मिळणार आहे. दुसरीकडे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या रासपचे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचा मात्र टेन्शन वाढणार आहे. तीन वेळ आमदार असलेल्या घनदाट यांनी अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं जाळं निर्माण केलं. आज सिताराम धनदाट यांच्यासोबत आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.
कोण आहेत सीताराम घनदाट ?
सीताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत. 2004 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले होते.
2009 साली विधानसभा निवडणूक 82000 मतांनी निवडून आले परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते 2009 मध्ये आमदार होते. नंतर ते निवडणुकीतही ते अपक्ष रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
नंतर विधानसभा निवडणुकीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. गंगाखेड विधानसभेचे तिकीट देण्यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्रयत्न केला होता. पण त्यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या जागी घनदाट यांना उमेदवारी देण्यात अडचणी आल्या. त्यामुळे घनदाट यांचा राष्ट्रवादीप्रवेश तेव्हा स्थगित झाला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे या दोघांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातून बाजी मारली होती. आता ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.