केोल्हापूरः पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात शेतकऱ्यांसाठी आंदोलन आणि चळवळीच्या मुशीतील कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडीबाबतच्या प्रश्नांना थेट उडवून लावले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, एप्रिल 2022 मध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीबरोबरचे आणि प्रस्थापित पक्षांबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत. त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीबाबत बोलताना स्पष्टपणे सांगितले की, स्वाभिमानी पक्षानं महाविकास आघाडीबरोबरचे सगळे संबंध तोडले आहेत,
त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका या स्वतंत्रपणे लढण्याचा विचार आम्ही करणार आहोत. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीबरोबरचा युती शक्य नसल्याचे सांगत चळवळ करत करत राजकारण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कारण चळवळीत तयार झालेला आणि चळवळीच्या मुशीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांना घेऊन राजकारण करणे योग्य आहे, कारण त्यांच्याशिवाय शेतकऱ्यांचा आवाज कोण उठवणार असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
महादेव जानकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, कधी काळी महादेव जानकर यांच्याबरोबर होतो मात्र आता प्रस्थापित पक्षांबरोबर आघाडी न करता छोट्या छोट्या पक्षाबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याबरोबर सकारात्म चर्चा सुरु असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे राजू शेट्टी त्यांच्या आघाडीचा विद्यमान आघाडीबरोबरचं आमचे संबंध चांगले नाहीत अशीही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
तर त्यामुळे आपला पक्ष, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि चळवळीच्या मुशीतून तयार झालेले नेते पाहिजेत आणि आता निर्णय आम्ही आता जनतेवर सोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडताना ते म्हणाले की, आघाडी आणि युतीबाबत आम्ही आमच्या मुद्यांशी ठाम आहोत.
कारण शेतकऱ्यांसाठी सत्तेला लाथ मारायची तयारी आम्ही ठेवली आहे. तर शेतकरी चळवळीला वाहून घेतल्यामुळे आघाडीचा संबंधच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी त्यांनी शरद पवार आणि तेलंगणांच्या मुख्यमंत्र्यानी दिलेल्या संधीची आठवण करुन देत म्हणाले की, त्यांनी मला ऑफर दिली असली तरी तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
मात्र पक्षाीय राजकारण करत राहिलो तर शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणणार कोण असा सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.