चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट घुसला थेट होंडा शोरूममध्ये…

| Updated on: Nov 30, 2023 | 6:03 PM

संतुलन बिघडल्याने ट्रक अनियंत्रित होऊन थेट होंडा शोरूममध्ये शिरला आणि भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रकचालक जखमी झाला.

चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट घुसला थेट होंडा शोरूममध्ये...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मोहम्मद इरफान, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गडचिरोली | 30 नोव्हेंबर 2023 : ट्रक चालवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. असाच एक धक्कादायक अपघात गडचिरोलीमध्येही झाल्याचे वृत्त आहे. ट्रकचे संतुलन बिघडल्याने ट्रक अनियंत्रित होऊन थेट होंडा शोरूममध्ये शिरला आणि भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.

चामोर्शी येथील शारदा होंडा शोरूममध्ये हा दुर्दैवी अपघात घडला. गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापली तालुक्यात सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरू आहे.  दररोज 500 ट्रक कच्चामाल वाहतुकीस नेतात. या ट्रकच्या वाहतुकीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होत असून नागरिकांनी अनेकदा या प्रकल्पाला विरोध केलेला पाहायला मिळाला आहे.

काल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे एक ट्रकच्या संतुलन बिघडल्यामुळे ट्रक शोरूम मध्ये शिरला. शारदा होंडा शोरूम असे या शोरूम चे नाव असून या शोरूम मधील साहित्य व शेड पूर्णपणे खूप मोठे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तर दुसरीकडे कच्चा माल वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला. यात एक ट्रक चालक जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात एवढा विरोध होत असला तरी सुरजागड प्रकल्प सुरू आहे. लोकप्रतिनिधी पण गप्प आहेत. काही प्रकल्पासाठी वेगळे रस्ते तयार करून हा कच्चा माल पाठवण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.