गडचिरोली : महाराष्ट्रात (Maharashtra) अशी अनेक गाव आहेत. जिथं अद्याप महाराष्ट्राच्या शासकीय सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे त्या लोकांना एखाद्या गोष्टीसाठी किती संघर्ष करावा लागतो हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. आरोग्य, शिक्षण या व्यवस्था गरजेच्या असताना सुध्दा तिथंपर्यंत पोहोचल्या नसल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. छत्तीसगड सीमेच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा (binagunda) गावातून एक कुटुंब चिमुकला आजारी असल्यामुळे कित्येक किलोमीटर पायी चालत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) दाखल झाले आहे. विशेष म्हणजे बाळाचा जीव वाचविण्यासाठी कुटुंबाने छातीभर पाण्यातून काढली वाट काढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. कुठलीही तक्रार न करता कुटुंब लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तब्बल 18 किलोमीटर पायी चालत त्यांनी दवाखाना गाठला. पुजारी-बुवाबाजी यांना स्थान न देता आदिवासी कुटुंबाची आरोग्य केंद्राकडे ओढ सध्या वाढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या भामरागड तालुक्यात विदारक दृश्य बघायला मिळाले. बाळाचा जीव वाचविण्यासाठी कुटुंबाने छातीभर पाण्यातून वाट काढली. छत्तीसगड सीमेच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा गावातून हे कुटुंब निघाले होते. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नसताना कुठलीही तक्रार न करता हे कुटुंब लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचले. तब्बल 18 किलोमीटर पायी चालत व पुजारी -बुवाबाजी यांना स्थान न देता आदिवासी कुटुंबाने आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. या भागातील बारमाही वाहणारे नाले- नद्यांमधून आदिवासींनी आधुनिक उपचाराची कास धरली असताना शासन मात्र सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे.