मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला. गजानन काळे यांच्या टीकेला अभिजित बिचुकले यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. गजानन काळे म्हणाले, आत्मविश्वास दोनच माणसांत पाहिला. एक संजय राऊत आणि दुसरे अभिजित बिचकुले. या वक्तव्याचा अभिजित बिचकुले यांनी समाचार घेतला. मनसेचा तुमचा जो पदाधिकारी आहे त्याचं नाव आहे गांजा काळे, असं बिचकुले यांनी गजानन काळे यांचं नामकरणचं करून टाकलं.
बिचकुले हे काळे यांना म्हणाले, तुझ्या घराच्या समोर येऊन तुला फरफटत उचलून नेईन. कृष्णकुंज बंगल्यावर राज ठाकरे यांच्यासमोर तुझं कानफाड फोडीन. तू काय गांजा ओढून काढला का, असंही ठणकावलं.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी अभिजित बिचकुले यांच्यावर कोटी केली. त्यानंतर अभिजित बिचकुले संतापले. गजानन काळे हे संजय राऊत यांच्याविषयी बोलत होते. संजय राऊत यांच्यावर टीका करत होते. बोलता बोलता त्यांनी अभिजित बिचुकले यांना मध्ये ओढलं.
अभिजित बिचुकले यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली. गांजा काळे तुझी संजय राऊत यांच्या चपलेजवळ उभं राहायची लायकी नाही, असंही सुनावलं.
त्यानंतर मनसेच्या घे भरारी अभियानाअंतर्गत सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गजानन काळे यांची जीभ घसरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेखही त्यांनी दाढीवाला असा केला.
आदित्य ठाकरे यांचा उल्लेखही त्यांनी आदुबाळ असा केला. त्यानंतर दुसरी आली आहे, काळी मांजर. रोज आडवी जात असते. अशी खालच्या पातळीवरची टीका गजानन काळे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली. त्यामुळं राज ठाकरे आता गजानन काळे यांना समज देणार का, असा सवाल केला जात आहे.