रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे (Ganptipule) अत्यंत सुंदर असं गणेश मंदिर. (Ganesh Temple) येथील गणेश मंदिरात श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे आशी मान्यता आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक गणपतीपुळ्यात सुट्ट्या असल्याकी दाखल होत असतात.
निसर्गसौदंर्याने नटलेलं गणपतीपुळे हे भाविकाचं आणि पर्यटकाचं फिरण्यासाठी अत्यंत आवडतं ठिकाण आहे. सुट्टया आल्या की इथे पर्यटकांची कायमच गर्दी होते. समुद्र किनाऱ्यालाच लागुन मंदिर असल्याने मंदिरात लाटांचा घनगंभीर आवाज, अथांग समुद्र, नजरेच्या टप्प्यात न मावणारा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा. सुंदर, सुबक अत्यंत रेखीव असं गणेश मंदिर. असा विलक्षण अनुभव इथे मिळतो. यापरिसरात सागराची रूपं, कोकणातील निसर्गसौदंर्य अनुभवता येते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या अजून संपलेल्या नसल्याने येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली.
यंदाच्या मे महिन्यात गणपतीपुळ्यात पर्यटकांचा उच्चांक पहायला मिळाला. या एका महिन्यात गणपतीपुळ्याला 4 लाखाहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. निर्बंधमुक्त फिरता येत असल्यानं पर्यटक आणि भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. गेली दोन वर्षे कोरोन निर्बंधामुळे फिरता येत नसल्याने यावर्षी पर्यंटक आणि भाविकांनी फिरण्याचा मनमुराद आनंद लुटला. स्थानिक व्यावसायिकांना पर्यटक वाढल्याने चांगलाच फायदा झाला. उत्पन्नात नफा मिळाला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील त्याचा चांगलाच परिणाम पडला होता.वाढलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे येत्या काळात परिसराचा आणि व्यवसायाचा देखील अधिक चांगला विकास होण्याची अपेक्षा आहे.
पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गणपतीपुळे येथे विविध दर्जेदार सुविधा गेल्या काही काळात निर्माण केल्या आहेत. कोरोनाच्या काळात दोन वर्षे सर्वंच ठिकाणच्या पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला होता. धार्मिकबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही गणपतीपुळेला पर्यटकांची कायमच अधिक पसंती असते.
पर्यटकांची संख्या वाढल्याने गणपतीपुळ्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मालामाल झाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मे महिन्यात एमटीडीसीला एका महिन्यात 1 कोटी 10 लाखांचे उत्पन्न मिळालंय. अत्तापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांधिक प्रतिसाद आहे.