जळगाव : भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्या सुरक्षेवरुन खळबळजनक विधान केले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सुरक्षा शिंदे-फडणवीस सरकारने काढून घेतली आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी हल्लाबोल करत एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेवरुन धक्कादायक विधान केले आहे. आपल्याला पोलीस सुरक्षा मिळावी म्हणून एकनाथ खडसे त्यांच्या सुरक्षारक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे, असाही गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यातच गाड्यांचा ताफा, पोलिसांना मागे फिरवून आपण किती व्हीआयपी आहोत, असं खडसे दाखवायचे असंही भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हंटलं आहे. एकूणच महाजन यांनी खडसे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून खडसे यांच्या सुरक्षेवरुन मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव मधील एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे कधीकाळी एकाच पक्षात होते. तेव्हा पासून खडसे आणि महाजन यांच्यात विस्तव देखील जात नाही अशी परिस्थिती आहे.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप सुरू असतात, त्यातच खडसे यांच्या सुरक्षेवरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यावर शिंदे – फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांची सुरक्षा काढून घेतल्याचे समोर आले आहे, त्यावरच महाजन यांनी गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
खडसे यांना धमकीचा फोन कुणी केला ? खडसे सुरक्षा मिळवण्यासाठी काय करायचे असे महाजन यांनी दाव्याने सांगितल्याने खडसे यांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे.
नुकतेच खडसे यांनी पोलीस ठाण्यात केलेले ठिय्या आंदोलनावर देखील महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका केली आहे. पोलीस तपास करीत आहे सर्व समोर येईल असेही महाजन म्हणाले आहे.
एकनाथ खडसे यांनी एवढी नाटकं करायची गरज नव्हती असे म्हणत ? उशिरा उपरती आल्याचा टोला देखील महाजन यांनी खडसे यांना लगावला आहे.