मुंबई : महिना उलटून गेला तरी आईशी संवाद न झाल्याने ईडीच्या (ED) अटकेत असलेल्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपल्या आईला पत्र लिहिले आहे. हे भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय नेत्यांच्या देखील त्यावर प्रतिक्रिया येत आहे. पत्राचाळ प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केलेले असतांना राऊतांनी बाकड्यावर बसून त्यांच्या आईला एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात गिरीश महाजन यांनी आपल्या आईला भेटता सुद्धा येऊ शकते ? असा प्रश्न उपस्थित करून राऊतांच्या पत्रावर आपलं मत व्यक्त केले आहे. जेलमध्ये कुणीही गेले की भावना उफाळून येत असतात. त्यामुळे त्यांनी आईला पत्र लिहिले आहे. पण त्यांच्या आईला देखील भेटू देऊ, त्यांना भेटता येऊ शकते असे मत महाजन यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधत असतांना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांनी आपल्या आईला लिहिलेल्या भावनिक पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांना ईडीकडून पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेची कारवाई केल्यानंतर राऊत यांनी आईला पत्र लिहिले आहे.
यामध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने आणि अन्यायाच्या विरोधात लढत असल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याचे म्हंटले आहे.
आईशी दररोज संवाद होत होता, पण तरुंगात असल्याने संवाद होत नसल्याने अनेक वर्षांनी पत्र लिहीत असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी लिहिलेले पत्र आज सगळीकडे व्हायरल होत असून त्यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतांना महाजन यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.