गोंदियातील 102 विधवा महिलांना मातोश्री पुरस्कार, या प्रतिष्ठाननं केला गौरव

| Updated on: Sep 10, 2022 | 5:00 PM

विधवांना पुरस्कार दिल्यानं समाजातील वंचितांचे मनोधैर्य वाढते. इतरांनाही याची प्रेरणा मिळते. असे पुरस्कार देऊन समाजात चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केलाय.

गोंदियातील 102 विधवा महिलांना मातोश्री पुरस्कार, या प्रतिष्ठाननं केला गौरव
Follow us on

गोंदिया : आझादीचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Amrit Mahotsav of Azadi) गंगूबाई डोंगरवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं श्यामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान मातोश्री पुरस्कार प्रदान समारंभ घेण्यात आला. गोंदियात पहिल्यांदा विधवा महिलांना (Widowed Women) अनोखा मातोश्री पुरस्कार (Matoshree Award) देण्यात आला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा येथे डोंगरवार प्रतिष्ठाद्वारे हा पुरस्कार तब्बल 102 विधवा महिलांना देण्यात आला. विशेष म्हणजे या पुरस्काराची सुरुवात एका मुलाने आपल्या विधवा आईला पुरस्कार देऊन केली. तिने आयुष्यभर केलेल्या पालन पोषणाची पोचपावती म्हणून या पुरस्काराची सुरुवात झाली.

समाजात विधवांचे जीवन उपेक्षितांचे जीवन असते. मात्र समाज व कुटुंबाचा जडघडणीसाठी विधवा महिलेची आई, बहीण, वहिणी आणि मुलगी म्हणून भूमिका महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन या विधवा महिलांचे आभार मानण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी साडीचोळी व श्रीफळ देऊन हा सत्कार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 102 विधवा महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला आमदारांसह गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. जुन्या आठवणीच्या उजाळ्याने कार्यक्रमादरम्यान परिसर भावनिक झाला होता. आता या अनोख्या पुरस्कार सोहळ्याची जिल्हाभर चर्चा होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

विधवांना पुरस्कार दिल्यानं समाजातील वंचितांचे मनोधैर्य वाढते. इतरांनाही याची प्रेरणा मिळते. असे पुरस्कार देऊन समाजात चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केलाय. डॉ. डोंगरवार म्हणाले, श्यामरावबापू प्रतिष्ठानतर्फे आम्ही सामाजिक काम करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फेही काम सुरूच असतं. माझी आई ४० वर्षांपासून विधवा आहे. तिनं माझं पालनपोषण केलं.

परिवारातील माणूस गेल्यानंतर परिवार सांभाळणं कठीण आहे. पती गेल्यानंतरही आई खचून न जात मुलांचं संगोपण करते. संस्कार करते. त्यामुळं त्यांचं समाजाप्रती मोठं योगदान आहे. या योजनेसाठी बँकेत पैसे ठेवले आहेत. त्यातून मिळणाऱ्या व्याजाच्या पैशातून याचा खर्च केला जाईल, असं डॉ. गजानन डोंगरवार यांनी सांगितलं.