3 कोटींच्या धान्याचे अपहार प्रकरण, आणखी दोन अधिकारी निलंबित

| Updated on: Oct 08, 2022 | 2:46 PM

विशेष म्हणजे त्याच्या या कामात मदत करणाऱ्या त्यांच्यासह तत्कालीन विपणन निरीक्षक एम. एस. इंगळे, प्रतवारीकार व विपणन निरीक्षक सी. डी. जुगनाके हेही सहभागी होते.

3 कोटींच्या धान्याचे अपहार प्रकरण, आणखी दोन अधिकारी निलंबित
धान्य खरेदीत भ्रष्टाचार, अधिकारी-व्यापारी मालामाल
Image Credit source: t v 9
Follow us on

शाहिद पठाण, Tv9 मराठी, प्रतिनिधी, गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या आलेवाडा व गोरे धान खरेदीत व भरडाईमध्ये अनियमितता (Paddy procurement scam) झाली. या प्रकरणी देवरी उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार याला महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या (Development Corporation) व्यवस्थापकीय संचालक पदावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आणखी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. या भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांचा आकडा आता तीन वर गेलाय. निलंबित अधिकाऱ्यात तत्कालीन विपणन निरीक्षक एम. एस. इंगले, प्रतवारीकार व विपणन निरीक्षक सी. डी. जुगनाके यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या तिघांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या तिघांवर 2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांच्या धान्याचा अपहार केल्याचे सिद्ध झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यात पणन महामंडळ व आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळद्वारे धान खरेदी केली जाते. यासाठी हे विभाग धान खरेदी केंद्राला मान्यता देऊन त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येतात. दोन्ही महामंडळ यांनी धान खरेदीत अनियमितता केल्याने त्यांची चौकशी सुरू होती.

आलेवाडा व गोरे या दोन्ही केंद्रांवर एकूण 2 कोटी 72 लाख 64 हजार 81 रुपयांच्या धान खरेदी घोटाळा करण्यात आला. तक्रार झाल्यावर व्यवस्थापकीय संचालक यांच्याद्वारे झालेल्या चौकशीत भ्रष्ठ अधिकारी आशिष मुळेवार यानं चौकशी केली.

पण, धान साठा शिल्लक नसणाऱ्या संस्थांवर कारवाई केली नाही. चौकशी अधिकाऱ्यांवर दबाब टाकणे आणि शासनाचे नुकसान करणे आदी दोष सिद्ध झालेत.

विशेष म्हणजे त्याच्या या कामात मदत करणाऱ्या त्यांच्यासह तत्कालीन विपणन निरीक्षक एम. एस. इंगळे, प्रतवारीकार व विपणन निरीक्षक सी. डी. जुगनाके हेही सहभागी होते. त्या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

आता या तिघांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात धान घोटाळ्यात एकाच प्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. इतर भ्रष्ट अधिकाऱ्याचे दाबे दणाणले आहेत.

त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान घोटाळ्यात अजून किती अधिकारी अडकतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती भंडाऱ्यातील प्रादेशिक कार्यालयाचे लेखा व्यवस्थापक सागर भागवत यांनी दिली.