गोंदिया : राज्यात एकीकडे कोरोना, अवकाळी पावसाचे संकट चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा काढला आहे. यावरून राज्यातील जनतेची त्यांना किती काळजी आहे हेच त्यावरून दिसून येतं अशा शब्दात काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री जरी अयोध्येला गेले असले तरी त्यात विशेष काय नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही तरीही ते अयोध्येला जाणार आहेत. मात्र ज्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी दौरा अयोध्या दौरा काढला आहे, त्याच प्रमाणे आम्ही पण अयोध्येला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले आहेत.
त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देत त्यामध्ये नवीन काय म्हणत म्हणाले राज्यातील शेतकरी आत्महत्या व शेतीच्या मालाला भाव मिळत नाही याकडे लक्ष देण्यापेक्षा अयोध्येला जाणं हे त्यांना महत्वाचं वाटतं या शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी करत नाही कारण पुण्यातील कसब्याची निवडणूक ते हरले आहेत. त्यामूळे भाजपा निवडणुकीला घाबरत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
तर आगामी काळातील निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत काँगेस कुणाशीही युती करणार नाही. भाजप बरोबर तर कोणत्याही पातळीवर युती केली जाणार नाही.
कारण भाजप शेतकरी विरोधी पक्ष आहे. तर दुसरीकडे स्थानीक बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप सोबत निवडणुका लढत असेल तर तेही शेतकरी विरोधी होतील अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
एकीकडे राज्यात अवकाळी आणि कोरोनाचे संकट असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. तर कोरोनानंतर लसीमुळे तरुण मुलं मुली मृत्यूमुखी पडली आहेत.
कोरोनाच्या काळात लसीकरण करण्यात आले मात्र अनेक तरुण मुलं मुली लसीकरणामुळे मरण पावली होती. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर केंद्र सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले की, लसीकरणाचा आणि आमचा काहीही संबंध नाही अशा शब्दात त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
कोरोना काळात केंद्र सरकारने लसीकरण केले, त्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटोही लावण्यात आला मात्र तरीही जबाबदारी झटकण्यात आली.