गोंदियाः पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार युद्ध जुपंले आहे. एकीकडे पोटनिवडणुकीचा एका मतदार संघातील निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला असल्याने महाविकास आघाडीकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना म्हणाले की, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वश्रेष्ठ असे संविधान दिले. त्या संविधानाला धक्का पोहचवण्याचं काम या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गोंदियामध्ये बोलताना जोरदार हल्ला करताना ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला बाजूला सारून.
काँग्रेस राष्ट्रवादीने देशात आणि राज्यात आतंकवाद्याप्रमाणे सरकार चालविली असल्याचा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कपिल सिब्बल यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या समर्थनाथ पाठिंबा दर्शविला होता. मात्र कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला नावं ठेवत भाजप नेत्यांकडून त्यांच्यावरच टीका केली जात आहे.
कपिल सिब्बल यांनी देशातील लोकशाहीसाठी व्यासपीठ उभा करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यानी टीका करताना त्यांच्यावर सडकून टीका केली होता.