गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमनी मोडक (Development Officer of Deori Panchayat Samiti) यांना 65 हजारांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) रंगेहात पकडले. तक्रारदार हे एका सहकारी संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेमार्फत देवरी तालुक्यात विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतींना टेंडर दिले जाते. त्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. यापूर्वी तक्रारदारांनी ग्रामपंचायत भागी आणि पिंडकेपार (Bhagi and Pindkepar) या दोन ग्रामपंचायतींना मनरेगा कामासाठी 38 लाख रुपयांचे साहित्य पुरविले होते. या दोन्ही कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराला 30 हजार हजार रुपयांची याआधी लाच दिली होती. पुन्हा तक्रारदाराची बिले मंजुरीकरिता पाठविण्यासाठी आणि पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेल्या कामाकरिता सही करून इस्टिमेट दिले. त्या मोबदल्यात पुन्हा 65 हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदाराने 17 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून 65 हजार रुपयांची लाच घेताना देवरी पंचायत समिती कार्यालयात अटक करण्यात आली. पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारदार एका सहकारी संस्थेचे सदस्य आहेत. तक्रारदाराच्या संस्थेमार्फत देवरी तालुक्यात विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतींना टेंडर झाल्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे काम केले जाते.
यापूर्वी तक्रारदारांनी भागी आणि पिंडकेपार या ग्रामपंचायतींना मनरेगा कामासाठी 38 लाख रुपयांचे साहित्य पुरविले. या कामांचे बिल मंजूर करण्यासाठी लाच दिली होती. तरीही पुन्हा तक्रारदाराची बिले मंजुरीसाठी पाठविण्यासाठी 65 हजार रुपयांची मागणी गटविकास अधिकाऱ्याने केली होती. एसीबीत तक्रार केल्यानंतर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाना याची शहानिशा केली. एसीबीने पंचासमक्ष सापळा रचला. 65 हजार रुपयांची लाच घेताना देवरी पंचायत समिती कार्यालयात चंद्रमनी मोडक यांना अटक करण्यात आली. मोडक विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 नुसार कारवाई करण्यात आली.