गोंदियाः राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच धूसफूस चालू चालू असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपमधील नेत्यांना अटक करण्याचा डाव मविआने केला होता असा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. त्यामुळे भाजप आणि मविआचा सामना आता रंगणार असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास विकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भाजपा नेत्यांना अडकाविण्याच षडयंत्र सुरू होते. भाजप नेत्यांना अटक करण्याचा आणि त्यांना आत टाकण्याचे हे काम मात्र सरकारी वकील करत होते असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
तर दुसरीकडे त्यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
त्याच प्रमाणे त्यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली आहे. सध्याच्या राजकारणात काँग्रेस हे डूबता जहाज आहे तर आता माहिती नाही त्यातून किती लोकं उड्या मारणार आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या प्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी टीका केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरह जोरदार हल्लाबोल केला आहे.
ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर युती केली आहे. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे हे एमआयएमबरोबरही युती करू शकतात अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
ज्या प्रमाणे ठाकरे गटाकडून युती केली जात आहे. त्याप्रमाणे जर बाळासाहेब ठाकरे असताना ही युती केली गेली असती तर त्यांना कधीच मान्य केली नसती असा टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.