गोंदिया : कोरोनामुळे अनेक नागरिकांना आपल्या रोजगारापासून मुकावे लागले. अनेक परिवारातील आधारस्तंभ हरपले. कोरोनाच्या काळात अनेक संघटनांनी सामाजिक बांधीलकी जपली. अशीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (State Primary Teachers Committee) द्वारा जिल्हातील जवळपास तीन हजार गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय किटचे वाटप करण्यात येणार आहे. पालकत्व गमावल्या विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना (Phule Student Adoption Scheme) सुरू करण्यात आली. अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यातील मिसीपीरी केंद्र आणि सालेकसा तालुक्यातील दरेकसा केंद्रामधील (Every center in Saleksa taluka) सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात येणार आहे. आज इस्तारी येथे 351 शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक किटमध्ये बॅग, कंपास, पेन, पेन्सिल, डिस्कनरी, वह्या, विविध प्रकारची पुस्तके असे एकूण बारा साहित्य आहेत.
मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून भरकटला गेलाय. सर्व समाज आपल्या मुलाच्या उज्ज्जल भविष्यासाठी शिक्षकांकळे मोठ्या आशेने पाहतोय. असे असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने पुढाकार घेतलाय. एक हात मदतीचा दर्शन घडवूया माणुसकीचा या उपक्रमाअंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यात आलीय. तीन वर्षापर्यंत सुरू राहणार आहे.
तसेच गरजू आणि गरीब तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी आज इस्तारी येथे 351 शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक किटमध्ये बॅग, कंपास, पेन, पेन्सिल, डिस्कनरी, वह्या, विविध प्रकारची पुस्तके असे एकूण बारा साहित्य आहेत. ही माहिती राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप तिडके व गोंदिया जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यात एक हात मदतीचा दर्शन घडवुया माणुसकीचा हा उपक्रम राबविण्यात येतोय. याअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा अभिनव उपक्रम राबविण्यात येतोय.