वेळ प्रत्येकाची येते, आज तुमचा टाईम असेल, उद्या आमचा टाईम असेल

| Updated on: Dec 03, 2022 | 12:03 AM

रुग्णवाहिका नाही. इमर्जन्सी आली तर त्याला नागपूरला रेफर कसं करायचं.

वेळ प्रत्येकाची येते, आज तुमचा टाईम असेल, उद्या आमचा टाईम असेल
सुषमा अंधारे
Follow us on

गोंदिया – सुषमा अंधारे यांनी गोंदियात चांगलीच बॅटिंग केली. त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे म्हणाल्या, गुवाहाटीतून आल्यावर बस्तान बसायला वेळ लागला. वेळ मिळाला तेव्हा दिल्ली वाऱ्या सुरु झाल्या. मग, यात गोरगरिबांकडं बघायचं कधी, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. सुधीरभाई ऐका बरं का, त्या माऊलीला का मदत मिळाली नाही म्हणून त्या माउलीच्या गावात गेलो. कारण माहिती आहे का, काही लोकं म्हणतात, सुषमाताई नुसतीचं भाषणं करतात. सुषमाताई फिल्डवर जाऊनही काम करतात, हे याचे पुरावे.

गावात गेलो. नातेवाईकाला भेटलो. तुम्हाला मदत मिळाली नाही. बँक अकाउंट नाही. आधार कार्डचं नाही. रहिवासी का नाही. कारण तिला राहायला घरचं नाही. १२ ऑगस्टची घटना होती.

YouTube video player

१५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी हे भाषण देत होते. भाईओ और बहनौ आझादीचे ७५ साल. हर घर मे तिरंगा लगेला. आम्ही मोदीजींचं ऐकलं. माऊलीला घरचं नाही. तिरंगा कुठं लावयचा. हे प्रश्न आम्ही महाप्रबोधनमधून विचारलं तर झोंबतं, असंही अंधारे यांनी सांगितलं.

घरकुल आवास योजनेचं काय झालं. पंतप्रधानांनी फेकून दिलं. १३० कोटी घरं बनवतोय. काय प्रत्येक व्यक्तीला घर देणार का. आम्ही आदिवासी झेंडा लावू इच्छितो. पण, झेंडा लावायला घरचं नाही. मग, झेंडा कुठं लावायचा असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.

असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारू नका, असं सांगतात. असे प्रश्न विचारणाऱ्याला बदनाम करण्याचा प्रश्न विचारला जातो. पंतप्रधान तीन-चार किलो शिव्या खातात. तर मग पाव-पाव किलो आम्ही बी शिव्या खाऊ, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात. जाहिरातीवरचा खर्च भरमसाठ आहे. चाराने की मुर्गी और बारानेका मसाला आहे. योजनांवर किती जाहिरात करावी. राजेहो विरोधकांनी हे प्रश्न विचारले पाहिजे. घरकुलाचं काय झालं.

देवेंद्र फडणवीस भंडाऱ्यात बोलले, आता धान खरेदीला सुरुवात केली. शेतकऱ्याला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे. अजूनही धान खरेदीला सुरुवात झाली नाही. काय करणार आहात. चौकशीचे आदेश दिले खरं. पण, चकार शब्द काढण्यात येत नाही.

अध्यापकांच्या पदांबाबत अडचण आहे. रुग्णवाहिका नाही. इमर्जन्सी आली तर त्याला नागपूरला रेफर कसं करायचं. पालकमंत्र्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे. कोविडचा काळ झाल्यानंतर ही भूलभूत गरज पूर्ण होऊ शकली नाही. सीटी स्कॅन आहे. पण, एमआरआय नाही. वेळ प्रत्येकाची येते, आज तुमचा टाईम असेल, उद्या आमचा टाईम असेल, असा इशाराचं सुषमा अंधारे यांनी दिला.