गोंदिया : राज्यात बहुतांश ठिकाणी धान कापणीचं काम आता संपलंय. धान मळणीच्या कामाला वेग आला आहे. गोंदिया जिल्ह्यातही सध्या सगळी धानाची मळणी करण्याचं काम जोरात सुरु आहे. मात्र धान मळीचं काम करता असतेवेळीच एका शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. थ्रेसर मशीनमध्ये अडकून एक शेतकरी ठार झाला. धान मळणीचं काम थ्रेशर मशीनच्या मदतीने हा शेतकरी करत होता. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना इतकी भयंकर होती की शेतकऱ्याच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेदा झाला.
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव गुड्डू पाटील असं आहे. या शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबीय पोरके झालेत. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपासही सुरु आहे.
राज्यातील अनेक शेतकरी धान मळणी करण्यासाठी थेसर मशीनचा वापर करतात. मात्र थ्रेसर मशीन वापरताना अधिक काळजी घेण्याच गरज गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथं घडलेल्या घटनेनं व्यक्त केली जातेय.
गुड्डू पटले हे गोरेगाव तालुक्यातल सोनी या गावातील शेतकरी आहेत. ते थ्रेशर मशीनवर धानाचे बोझे टाकत होते. पण अचानक ते थ्रेशरमध्ये सापडले गेले आणि यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गोरेगाव तालुक्यातील देऊटोला शेतशिवारात ही दुर्दैवी घटना घडली. पटले यांच्या कुटुंबीयांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
गुड्डू पटले हे धानाचे बोझे टाकत असतेवेळी अचानक मशीनमच्या आत ओढून त्यात दबले गेले. यात त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन मशीनमध्येच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद गोरेगाव तालुक्यातील पोलिसांनी घेतली असून आता पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर आता इतर शेतकऱ्यांनी थ्रेशर मशीनचा वापर अधिक