गोंदिया : कृषी पंपाच्या विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव येथे घडली. कमलचंद अंताराम मेंढे वय 62 असे मृतकाचे नाव आहे. कमलचंद हे आपल्या शेतावर गवत आणण्यासाठी गेले होते. त्यांना न कळत शेतातील विद्युत पंपाच्या वायरचा शॉक लागला. शॉक इतका जबर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. लागलीच याबाबत विद्युत कर्मचाऱ्याला सूचना देऊन विद्युत सप्लाय बंद करण्यात आला. मात्र तोपर्यंत कमलचंद यांचे प्राण गेले होते. दरम्यान त्याचे शव विच्छेदनाकरिता (Autopsy) सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठवण्यात आले. तपास डुग्गीपार पोलीस (Duggipar Police) करीत आहे. अचानक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने वडेगावात हळहळ व्यक्त होत आहे. आता त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.
वडेगाव येथील कमलचंद मेंढे हे नेहमीप्रमाणे शेतावर गेले. शेतातून गुरांसाठी गवत आणणार होते. जनावरांना चारा मिळाला असता. जनावरांकडून दूध तसेच शेण शेतकऱ्याला मिळाले असते. नेहमीप्रमाणे कमलचंद शेतावर गेले. आज काही अघटीत घडेल, याची त्यांना कल्पना नव्हती. पण, अचानक विद्युत पंपाच्या वायरचा शॉक त्यांना लागला. यात ते जागीच ठार झाले.
वडेगाव हे डुग्गीपार पोलीस ठाण्या अंतर्गत येते. त्यामुळं या घटनेचा तपास डुग्गीपार पोलिसांकडं सोपविण्यात आला. विद्युत शॉक कसा लागला याचा तपास पोलीस करतील. मृतक कमलचंद मेंढे यांचा मृतदेह सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल.
कमलचंद मेंढे हे शेतकरी होते. ते घरचे कमावते व्यक्ती होते. त्यांच्या जाण्यानं कुटुंबावर फार मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.