गोंदिया : देशात एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव साजरा करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्या अंतर्गत चुंभली (Chumbli) गाव येते. येथील लोकांना अद्याप इंग्रजांच्या तावडीतून सुटका झाली नसल्यासारखे वाटते. याला कारण चुंभली वासीयांना अजूनही हक्काचा रस्ता नाही. नदीवर पूल नाही. बोटीने नदीतून धोकादायक प्रवास (Boat Travel) करावा लागतो. देवरी तालुका मुख्यालयाशी जाणारा रस्ता ओलांडताना बोटीनं मोठी कसरत करावी लागते. देवरी विधानसभा ( Vidhan Sabha) क्षेत्राचे आमदार सहषराम कोरेटे हे आमदार म्हणून निवडून आहे. तेव्हा कोरेटे यांनी चुंभली वासियाना 2020 मध्ये एक बोट भेट दिली होती. मात्र ती देखील आज मोडकडीस आली. गावकऱ्यांना नदी ओलांडताना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्यात चुंभली वासीयांना चार किलोमीटरचा खडतर प्रवास करावा लागतो.
गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 4 किलोमीटर चिखलातून पायपीट करत केली पाहणी pic.twitter.com/P8yGbmfdMD
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) July 24, 2022
या आधी निवडून आलेल्या आमदारांनी गावकऱ्यांना निवडणुकीपुरते पोकळ आश्वासन दिले. मात्र कुणीही या ठिकाणी रस्ता तसेच पूल बांधायला पुढाकार घेतला नाही. आमदार कोरेटे यांनी स्वतः पुढाकार घेत थेट जिल्हा प्रशासनालाच या गावात आणत रस्त्याची वस्तुस्थिती दाखवून दिली. जिल्हाधिकरी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व् पानसरे यांनी या गावात हजेरी लावत परिस्थितीचा आढावा घेतला. लवकरच या ठिकाणी एक पूल तसेच रस्ता बांधून देऊ, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
चुंभली गावात 65 घरे असून 350 च्या वर लोक राहतात. गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल स्वतः जिल्हाधिकऱ्यानी दखल घेतली. याबद्दल तुलशीदास खोब्रागडे, कैलास पंधरे, मुलचंद उपाध्ये आदी गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. जिल्हाधिकारी पहिल्यांदा चुंभली गावात आल्याने गावकरी खूश होते. येत्या काहीच दिवसात या नदीच्या पत्रावर एक पुल बांधू असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले आहे. त्यामुळे खरच चुंभली गावात रस्ता आणि पूल तयार होते काय हे पाहण्यासारखे असेल…