गाडीत पेट्रोल भरुन घरी परतत होते, इतक्यात समोरुन भरधाव बाईक आली अन् घरी पोहचण्याऐवजी…

| Updated on: Apr 26, 2023 | 9:00 PM

बाईकमध्ये पेट्रोल भरुन दोघे पती-पत्नी आपल्या बाईकवरुन घरी जायला निघाले. तितक्यात समोरुन एक भरधाव बाईक आली अन् जोडपे घरी पोहचण्याआधीच सर्व संपलं.

गाडीत पेट्रोल भरुन घरी परतत होते, इतक्यात समोरुन भरधाव बाईक आली अन् घरी पोहचण्याऐवजी...
दोन बाईकची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

शाहिद पठाण, गोंदिया : जिल्ह्यातील देवरी येथे एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन बाईकची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात दोन बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मिर्झा अलीम बेग आणि हितेश श्रीवास अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी तात्काळ देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. देवरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे.

विरुद्ध दिशेने येणारी बाईक धडकली

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील पेट्रोल पंपवर गाडीमध्ये पेट्रोल भरून मिर्झा अलीम बॅग हे बाईकवरुन आपल्या पत्नीसोबत घरी चालले होते. यावेळी पेट्रोल पंपासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव बाईकने त्यांच्या बाईकला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अपघातात दोन्ही बाईकचा चक्काचूर झाला. अपघातात मिर्झा आणि दुसरा दुचाकीस्वार हितेश हे जागीच ठार झाले. तर मिर्झा यांची पत्नी गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

भंडाऱ्यात एसटी बसला टिप्परची धडक

भंडारा-लाखनी राष्ट्रीय महामार्गावर अशोका हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा येथून गोंदियाकडे जाणाऱ्या एसटी बसला गिट्टीने भरलेल्या टिप्परने मागून धडक दिली. यामध्ये 8 प्रवासी जखमी झाले असून, 8 पैकी 1 प्रवाशी गंभीर जखमी आहे. सुरेखा विनोद मुटकुरे असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. बसमध्ये एकूण 19 प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच भंडाराचे सामाजिक कार्यकर्ते आवेश पटेल आणि इम्रान पटेल यांना मिळताच त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हे सुद्धा वाचा