गोंदिया : नागराज मंजुळे यांचा नाळ चित्रपट आपण पाहिला असणारच. या चित्रपटातील चैत्या नामक चिमुकला आपल्या आईला आई मला खेळायला जाऊ दे ना, असा हट्ट आईकडे करतो. मात्र गोंदियात काही उलट चित्र पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या (Gondia Zilla Parishad) भागी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने आपल्या आईकडे आई मला शाळेत जाऊ देना, असा हट्ट धरला. आई एकत नसल्यामुळे या चिमुकलीने गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे (Collector Nayana Gunde) यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. जिल्हाधिकाऱ्यांनाच फोन करीत शाळा सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तिच्या विनंतीला मान देत एका आठवड्यात शाळा (School in a week) सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या भांगी जिल्हा परिषद शाळेत भूमी बंग शिकते. भूमी ही देवरी शहरातील उद्योगपती मिथुन बंग यांची मुलगी आहे. तिला दोन भावंड आहेत. ते खाजगी शाळेत शिक्षण घेतात. मात्र भूमी मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र कोरोना विषाणुमुळे वर्ग एक ते आठवीपर्यंतच्या शाळा मागील दोन वर्षांपासून बंद आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात इंटरनेट हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाही. ऑनलाईन शिक्षण घेताना येत असलेल्या अडचणी पाहता तसेच लगतच्या भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून वर्ग पहिली ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. आपल्या जिल्ह्यात शाळा का सुरू होत नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही तिला उतम प्रतिसाद देत एका आठवड्यात सुरु करू, असे आश्वासन दिले आहे.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 12, 2022
गेल्या कित्तेक दिवसांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळं विद्यार्थी घरी राहून कंटाळलेत. त्यामुळे शाळा केव्हापासून सुरू होईल, असं विद्यार्थी विचारत आहेत. पालकही विद्यार्थी घरी असल्यानं कंटाळलेत. विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. यामुळंच थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करेपर्यंत विद्यार्थी हिंमत करू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भूमीशी बोलून तिचे म्हणणे समजून घेतले. ही एका विद्यार्थिनीची प्रातिनिधीक प्रतिक्रीया आहे. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू व्हावी, असंच वाटतं.