Raj Thackeray : पोरगाच जन्माला आला नाही, त्याच्या लग्नाचा विचार कसला करताय?; प्रफुल्ल पटेल यांचा पहिल्यांदाच राज ठाकरेंना टोला

| Updated on: Nov 02, 2024 | 4:02 PM

Praful Patel Attack on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका टीव्ही कार्यक्रमांमध्ये पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सोबत असेल असे वक्तव्य केले होते. अजून मुलगा जन्माला आला नाही त्याचं लग्न कुठे करायचं याचा विचार करणे योग्य नाही असा टोमणा प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे याना लगावला.

Raj Thackeray : पोरगाच जन्माला आला नाही, त्याच्या लग्नाचा विचार कसला करताय?; प्रफुल्ल पटेल यांचा पहिल्यांदाच राज ठाकरेंना टोला
प्रफ्फुल पटेल राज ठाकरे
Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका टीव्ही कार्यक्रमांमध्ये पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार आणि मनसे सोबत असेल असे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे यांना टोमणा मारला आहे. त्यावर मला इतकच म्हणायचे आहे की आधी कोणाचे किती जागा निवडून येतात त्याचा विचार करणे योग्य आहे. अजून मुलगा जन्माला आला नाही त्याचा लग्न आणि साक्षगंध कुठे करायचं हे योग्य नाही असा टोला पटेल यांनी राज ठाकरे यांना लगावला.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

विधानसभा निवडणुकीनंतर मनसे हा भाजपसोबत जाणार असल्याचं मोठं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल, आमच्या साथीने असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांनी राजकारणातील नवीन समीकरणावर चर्चा सुरू झाली.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या रस्सीखेच संदर्भात प्रफुल पटेल यांना प्रश्न केले असता महाविकास आघाडी सत्तेतच येणार नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. तर महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच काल्पनिक आहे.. एक पक्षांमध्ये तीन-तीन दावेदार त्यांच्याकडे आहेत. तर तुमच्याकडे इतके प्रबल दावेदार आहेत तुम्ही नाव जाहीर का करत नाही.. असाही सवाल पटेल यांनी विचारला.

नवाब मलिकप्रकरणात सावध भूमिका

नवाब मलिकांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये अनेक वादंग पाहायला मिळत आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता पटेल यांनी सांगितले की, नवाब मलिक आमचे सहकारी आहेत.आमदार मंत्री सर्व पदावर ते राहिले आहेत. तसेच त्यांनी कुठलाही गुन्हा केला आहे असं कोर्टात सिद्ध झालेला नाही. आम्ही त्यांना तिकीट दिलं आहे. भाजप आणि शिवसेनेला त्यांची मदत करायची नसेल किंवा दुसरा उमेदवार द्यायचे असेल तर ती त्यांची इच्छा आहे. मात्र याच्यामुळे महायुतीच्या इतर दुसऱ्या जागांवर परिणाम होणार नाही याची काळजी आम्ही घेणार अशी सावध भूमिका पटेलांनी घेतली.