गोंदिया : जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना. गोठणगाव येथे मनोहर टेकाम (manohar tekam) यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. लग्नाच्या पूर्वीच मनोहर टेकाम यांचं संपूर्ण घर आग लागून जळून खाक (house burnt to ashes) झालं. टीव्ही 9 ची टीम तिथे पोहचली. वास्तवीकता बघून बातमी केली. या बातमीची दखल जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली. सामान्य जनतेनेही या बातमीची दखल घेतली. टेकाम कुटुंबीयांना मदत पोहचती केली. यात जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्यापासून तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पैशाची व भांड्यांची (money and utensils) मदत केली. प्रकल्प अधिकारी कार्यालयातून गहू, तांदूळ व इतर धान्य उपलब्ध करून दिले. याशिवाय प्रणय अजहर यांच्या क्लॉथ सेंटरकडून भावी वधूला लाचा व कुटुंबाला कपड्यांची मदत केली. रितेश अग्रवाल यांनी सुद्धा मदतीच्या हाथ पुढे केला. या सर्व मदतीने टेकाम कुटुंब गहिवरले. त्यांनी टीव्ही 9 चे व मदत कर्त्याचे आभार मानले आहे.
मुलीचं लग्न ठरलं होतं. त्यापूर्वीच घराला आग लागून घरासह लग्नासाठी खरेदी केलेल्या वस्तुंची राखरांगोळी झाली. घरात अंगावर घालायलाच कपडेही उरले नव्हते. तर लग्न कसे करायचं हा प्रश्न त्या वडिलाला भेडसावत होता. मनोहर टेकाम यांच्या मुलीचे एप्रिल महिन्याच्या 25 तारखेला लग्न ठरलं. लग्न म्हणजे की बापासाठी एक उत्सत्वच असतो. मोलमजुरी करून जमवलेली कमाई मुलगी मनीषा हिच्या लग्नासाठी खर्च करून टाकली. लग्नाला लागणारे कपडे, अन्नधान्य, दागिने सर्व खरेदी करून त्यांनी जमा करून ठेवले. आता घर सुंदर दिवसा म्हणून त्यांनी घराला रंगरंगोटी करण्यासाठी त्यांनी सर्व सामान घराच्या समोरच्या छपरीत आणून ठेवला.
टेकाम कुटुंब रात्री झोपी गेले. मात्र काळाच्या मनात काही दुसरेच शिजत होते. रात्री अचानक आरडाओरड सुरू झाली. टेकाम कुटुंब उठून बाहेर येतो तर काय घराला आग लागली. पाहाता पाहता आगीने रौद्र रूप घेतले. लग्नासाठी खरेदी केलेले एक एक सामान जळून खाक झाले. लोकांच्या मदतीने आग विझली खरी; मात्र लग्नासाठी खरेदी केलेल्या सामानाची राख रंगोळी झाली. मनीषाचे वडील चिंताग्रस्त झाले. पत्नी दुर्गा याही खचून गेल्या. आता मुलीचं लग्न कसं करावं. जगावं कसं, असा प्रश्न त्यांच्यापुढं निर्माण झाला. मुलीलाही आईवडिलांची स्थिती पाहून होत नव्हती. अशात मदतीचा ओघ सुरू झाल्यानं नव्यांन त्यांनी आपली उपजिवीका सुरू केली.