गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकावर एका महिलेचे प्राण वाचविण्यात आरपीएफ जवानाला (RPF Jawan) यश आले. गोंदिया रेल्वे स्टेशनमध्ये ट्रेन क्रमांक 12833 गोंदिया स्थानकावर (Gondia Railway Station) आली. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर 8:22 वाजता पोहचली. गाडी प्लॅटफॉर्मवरून सुरू झाली. त्याचवेळी चालत्या ट्रेनमध्ये (Dhavati Train) एक महिला प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, तिचे संतुलन बिघडले. त्यामुळं ती महिला खाली पडण्याची शक्यता होती. ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल डी. के. लिल्हारे यांच्या ही बाब लक्षात आली. ते धावत महिलेच्या दिशेने गेले. रेल्वेतून ती खाली पडेल, अशात तिला रेल्वेत ढकलले. यामुळं तीम महिला रेल्वेत सुखरूप पोहचली. या जवानाने जीवाची पर्वा न करता ही कामगिरी केली.
व्हिडिओमध्ये ही घटना कैद झाली. हा अपघात होता होता थोडक्यात बचावला. जवानाने प्रसंगावधान साधून महिलेचे प्राण वाचविले. त्यामुळं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. cctv कव्हरेजवरच्या अधिकार्यांना पाठवण्यात आले. त्यांनीही जवानाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. जवान धावत गेले नसते, तर कदाचित या महिलेला रेल्वेच्या ट्रकखाली यायला वेळ लागला नसता. गोंदियाच्या जवानांनी ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत केलेले कार्य कौतुकास्पद आहे. धावत्या ट्रेनमधून महिला खाली पडत असताना धक्का देत सुखरूप डब्ब्यात पोहचविले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 12, 2022
अशाच प्रकारची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. गोंदिया रेल्वेस्थानकावर कधीकधी रेल्वेत बसण्यासाठी गर्दी असते. ट्रेन सुटू नये, म्हणून काही प्रवासी धावत -धावत जातात. अशावेळी अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. पण, आरपीएफचे जवान या सर्व घटनांवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यामुळं काही प्रवाशांचे प्राण वाचण्यास मदत होते. जवान आपले रक्षण करतात. त्यामुळं त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. रेल्वेतून जाताना नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होतील, असं रेल्वेच्या स्टेशन मास्टरांनी सांगितलं.