गोंदिया : गोंदियासह (Gondia) राज्यात इतरही ठिकाणी लोक सर्रासपणे वाहनांच्या नंबर प्लेटवर (Vehicle Number Plate) प्रेस, भाऊ, दादा, पोलीस, असं लिहिलं जातं. काही वाहनांच्या (Vehicle) नंबर प्लेटला त्या नावांच्या पद्धतीनं बनवतात, ज्यामुळे बाईकचा नंबर आणि हव्या असलेल्या नावाचा उल्लेख होईल. हे अगदी नियम तोडून सर्रासपणे केलं जातं. बरं, हे सर्व जबाबदार मंडळींच्या मोठ्या गाड्यांवर देखील सर्रासपणे होताना दिसतंय. कायदे आणि वाहतूक नियमांचे सर्व नियम धाब्यावर बसवून अशा प्रकारचे कृत अलीकडेच गोंदियात देखील समोर येत आहे. लोक गाड्यांवर भाऊ, दादा अशा प्रकारचे शब्द लिहितात, यामुळे नंबर प्लेट स्पष्ट दिसत नाही आणि वाहतूक नियमांचं देखील उल्लंघन केलं जातं. आता यावर गोंदियात खास ड्राइव्ह घेण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखेकडून खास ड्राइव्ह घेण्यात आला आहे. आता तुम्ही वाहनांवर दादा, मामा लिहिल्यास आणि तेच गोंदिया वाहतूक पोलिसांच्या दृष्टीस पडल्यास तुम्हाल दंड आकारल्या जाऊ शकतो. पोलिसांनी तुमच्या वाहनांच्या नंबर प्लेटवर पहिल्यांदा भाऊ, दादा किंवा तत्सन नाव पहिल्यांदा पाहिल्या 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा तोच अपराध केल्यास दीड हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. सुधारित वाहतुक कायद्यात ही तरतुद करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शाखा त्यासाठी खास ड्राइव्ह घेत आहे. वाहनांच्या नंबरप्लेटसह वाहनावर दादा, मामा, पोलीस असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. अनेक जण वाहनांवर नंबर टाकतानाच दादा, नाना, काका या नावांसह पोलीस, प्रेस, व्हीआयपी असे देखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या नंबर शिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात.
दादा, भाऊ, अशा नंबर प्लेटवर यापूर्वी देखील राज्यातील इतर भागात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, हे त्यावेळी देखील तत्पुरत्या स्वरुपाची कारवाई असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पुन्हा लोक वाहनांवर भाऊ, दादा, काका, नाना असे शब्द टाकताना दिसून आले. यावर कायमस्वरुपी कारवाई करण्याची गरज आहे. कुणालाही किंवा कोणत्या बड्या आणि जबाबदार मंडळींच्या गाडीकडे देखील दुर्लक्ष होता कामा नये, यातून वाहतूक नियमांची पुरेपुर अंमलबजावणी होईल. यातून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर देखील आळा बसेल.