गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात रक्षाबंधनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला प्रवेश मेळाव्याचे (Women’s admission meeting) आयोजन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यच्या आठ तालुक्यांतील शंभरच्या वर महिलांनी मनसेत प्रवेश केला. महाराष्ट्र सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. या कार्यक्रमात मनसे नेते हेमंत गडकरी, गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख राहुल बलवार आणि माजी जिल्हाध्यक्ष गोंदिया रितेश गर्ग हे उपस्थित होते. राज्यात शिंदे गट आणि भाजपाची सरकार असताना या सरकारला राज्यातील महिलांच्या सुरक्षितेची (Safety) फिकर नाही. महिलांनी रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) पवित्र सण कुणाच्या विश्वासावर साजरा करावा, असा प्रश्न महिलांना पडत आहे, अशी टीका हेमंत गडकरी यांनी केली.
हेमंत गडकरी म्हणाले, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन गोंदिया जिल्ह्यातील शेकडो महिलांनी मनसेत प्रवेश केला. मनसे विद्यार्थी सेनादेखील या प्रवेश मेळाव्यात समोर होती. महाराष्ट्राच्या सरचिटणीस रिटा गुप्ता म्हणाल्या, मला आनंद होतो. गोंदियाच्या टीमला मनापासून शुभेच्छा देते. रक्षाबंधन असताना महिला मनसेशी मोठ्या प्रमाणात जुडल्या आहेत.
रिटा गुप्ता, मनसे pic.twitter.com/OZ1ALnbKwA
— Govind Hatwar (@GovindHatwar) August 12, 2022
हेमंत गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री बदलतो. सत्ता बदलते. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या पदरात काही पडत नाही. मनसेची वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात आता एकच पर्याय आहे. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याच्याकडं मनसेचा ओढा आहे. सर्वांच्या मनातली खदखद आहे. राज्यातील जनतेचा विश्वास एकाच नेत्यावर उरला आहे. तो म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे होय. गोंदिया, गडचिरोली, भंडारा, नागपूर या भागात मनसे वाढताना दिसत आहे. आगामी काळात राज ठाकरे यांचा दौरा नक्की होणार. नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा काही दिवसात होणार आहे. ते काही दिवसात विदर्भात दौरा करणार आहेत, अशी माहिती मनसेचे हेमंत गडकरी यांनी दिली.