पुणे : मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती लोक गेल्यानंतर मुंबईत पैसा उरणार नाही आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही. असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केल्यानंतर आता त्या विरोधात संतापची लाट उसळली आहे. राष्ट्रवादीकडून (NCP) राज्यपालांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू झाली आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आम्ही राज्यपालांच्या विधानाचं समर्थन करत नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि भाजपने आधीच हात वरती केलेले आहेत. मात्र आता त्यावर राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील यांनी राज्यपालांची खिल्ली उडवली आहे. राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. या राज्यपालांनी पायउतार व्हावं, अशी थेट मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे. तसेच राज्यपालांवरती टीका करताना रूपाली पाटलांचीही जीभ घसरल्याचे दिसून आले.
राज्यपाल भगतसिंह कौशल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रूपाली पाटील म्हणाल्या, राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. भाजपाल राज्यपालांनी पायउतार व्हावं. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांची माफी नको आता थेट त्यांना पदावरून दूर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज्यपालांच्या या वक्तव्यामागे भाजप आहे, असा आरोपही त्यांनी केली आहे. म्हाताऱ्या राज्यपालांची उच्चलबांगडी करावी म्हणताना रूपाली पाटलांची जीभ घसरल्याचे दिसून आले.