रत्नागिरी : जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर बिनविरोध उमेदवारांची संख्या 1814 आहे. आणि जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी 4332 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Grampanchayat Election in Ratnagiri District)
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात निवडणुका अटळ झाल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीमध्ये 9 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 41 ग्रामपंचायतीमध्ये एकूण उमेदवार 559 त्यातील 136 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
दापोली तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीमध्ये 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 42 ग्रामपंचायतमधील 99 प्रभागासाठी 459 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या 130 प्रभागात 712 उमेदवार रिंगणात आहेत तर 180 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
खेड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीमध्ये 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून प्रत्यक्ष मतदान 64 ग्रामपंचायतीत होणार असून 685 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. त्यातील 330 उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत.
लांजा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीमध्ये 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 19 ग्रामपंचायतीमध्ये 216 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात असून 72 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
गुहागर तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीमध्ये 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 16 ग्रामपंचायतीमध्ये 170 उमेदवार रिंगणात असून 152 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तसंच 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
मंडणगड तालुक्यात 15 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाली असून 13 ग्रामपंचायती मध्ये 113 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत.
चिपळूण तालुक्यात 83 ग्रामपंचायती मध्ये 22 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 61 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यात 81 ग्रामपंचायतीमधील 19 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून 62 ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 1949 उमेदवार बिनविरोध झाले असल्याने आता चित्र स्पष्ट झाले आहे.
(Grampanchayat Election in Ratnagiri District)
हे ही वाचा :
बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वच 77 उमेदवारांची माघार!
ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!