राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांचा शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांना हेवा, म्हंटले आम्हाला तसं काम करायचंय…

| Updated on: Oct 14, 2022 | 8:48 PM

जळगाव येथील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे होते, विरोधी पक्षाच्या नेत्याच्या कामाबद्दल असलेला हेवा गुलाबरावांनी बोलून दाखविला आहे.

राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांचा शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांना हेवा, म्हंटले आम्हाला तसं काम करायचंय...
Image Credit source: Social Media
Follow us on

अनिल केऱ्हाळे, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या एका विधानाने चर्चेला उधाण आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित पाणीपुरवठा विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सरपंच परिषद देखील आयोजित करनेत आली होती. त्यावेळी त्यांना भाषणादरम्यान राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची आठवण झाली होती. आर आर पाटलांनी (R R Patil) जसं काम केलंय तसंच काम आपल्याला करायचे असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे. खरंतर दिवंगत आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मंत्री होते. त्यांच्या ग्रामीण भागातील योजनेमुळे त्यांची आजही आठवण ग्रामीण भागातील जनतेला होत असते. मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची काढलेली आठवण आज चर्चेचा विषय ठरत आहे.

जळगाव येथील कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान अनेकांच्या भुवया उंचवणारे होते, विरोधी पक्षाच्या नेत्याच्या कामाबद्दल असलेला हेवा गुलाबरावांनी बोलून दाखविला आहे.

आर आर पाटलांनी ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने आम्हाला काम करायचा आहे असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखविले आहे.

हे सुद्धा वाचा

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी दिवंगत नेते आर आर पाटलांच्या कामांचे कौतुक केले.

ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्ती गाव, बिना बजेटच्या योजना राबवून आर आर पाटील यांनी लोकांना तयार केल्याचे म्हंटले आहे.

त्याच पद्धतीने गाव तुमचं, पाण्याची टाकी तुमची, नळ तुमचा करायचा असेल तर ग्राम जलदूत व्हा असे आवाहन गुलाबराव पाटलांचे सरपंचांना केले आहे.

दरम्यान आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे होते तरीही गुलाबरावांनी पाटलांनी त्यांच्या पद्धतीने काम करायचे आहे असे इच्छा बोलून दाखवल्याने जळगावात चर्चा होऊ लागली आहे.