मुंबई : काल होळीचा सण साजरा झाला. सगळीकडे होळीचं दहन झालं. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उभी पिकं जाळत सरकारचा निषेध केला. तर आज धुलिवंदन आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तुम्हा सर्वांना tv9 मराठीकडून धुलिवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात विविध रंगी आनंदाची उधळण होवो याच सदिच्छा… मनसोक्त रंग खेळा पण स्वत:ची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या… होळीशी संबंधित सर्व अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. सर्व अपडेट वाचा एका क्लिकवर…
IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सीजन सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला धक्का बसला आहे. आधीच ऋषभ पंत नसल्याने ही टीम बॅकफूटवर आहे. वाचा सविस्तर….
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी आज आगळी वेगळी होळी साजरी केली.
नवी मुंबई पोलिसांनी आज पनवेल मधील बाल आश्रमातील मुलांसोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली .
पनवेल मधील बाल ग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बंजारा समाजातील लेंगी नृत्य सादर करत होळीचा जल्लोष
हलगीच्या तालावर बंजारा महिलांचे लेंगी नृत्य
संदीपान भुमरे यांच्या घरासमोर सुरू होळीचा जल्लोष
गेली 27 वर्षापासून भोई प्रतिष्ठान पुण्यात करत आहे रंगोत्सव साजरा
रंगोत्सवात अनाथ, एचआयव्ही बाधित, अंध, अपंग मुले यांच्या समवेत खेळली जाते धुळवड
चिमुकल्यांचा डान्स करत धुलीवंदनात जल्लोष
पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात
माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांनी साजर केलं धुलीवंदन
आपल्या मॉर्निंग ग्रुपसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दत्तामामा भरणे यांचा रंग खेळत आनंद उत्सव
पुण्यातील तळजाई टेकडीवर दत्तामामा भरणे यांनी खेळला रंग
लोक रंगीबेरंगी गुलालाची होळी खेळत आहेत.
जुहूमध्ये लोक ढोल वाजवून होळीच्या तालावर नाचताना दिसले.
मुंबईतील विविध भागातून आलेले हे लोक सकाळपासूनच होळीचा सण साजरा करत आहेत.
कोरोनानंतर लोक यावेळी उघडपणे होळी खेळताना दिसत आहेत.
रंग लावत नागरिकांनी लुटला सणाचा आनंद
होली है….