मृत्युनंतर 17 महिन्यांनी त्याने स्वर्गात घेतली कोरोनाची लस

| Updated on: May 18, 2023 | 4:35 PM

नागपुरामधील एक आजोबा थेट कोल्हापूरमध्ये पोहोचले. पण, ते तेथे कसे पोहोचले, कसे गेले हे नातेवाईकांना कळले तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले, नव्हे हे आक्रीत कसं घडले याचीच चर्चा होत आहे.

मृत्युनंतर 17 महिन्यांनी त्याने स्वर्गात घेतली कोरोनाची लस
NAGPUR NEWS
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. चमत्कार करणाऱ्यांची आणि त्यावर श्रद्धा, अंधश्रद्धा ठेवणाऱ्यांची इथे काही कमी नाही. अधिकाऱ्यांचा गलथान कारभार त्यामुळे सामान्य जणांचे होणारे नुकसान याची तर गिनतीच नाही. असे प्रकार दिवसागणिक घडताहेत. पण, चुका करणारे काही सुधारायचे नाव घेत नाहीत. याच शृंखलेतील आणखी एक घटना समोर आली आहे. ही घटना नागपूरमध्ये घडलीय. नागपुरामधील एक आजोबा थेट कोल्हापूरमध्ये पोहोचले. पण, ते तेथे कसे पोहोचले, कसे गेले हे नातेवाईकांना कळले तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले, नव्हे हे आक्रीत कसं घडले याचीच चर्चा होत आहे.

शिवाजी हिरामण डांगे हे नागपूरच्या लालगंज मेहंदीबाग परिसरात ते रहात होते. सिक्युरिटी गार्ड म्हणून ते काम करत होते. वयाच्या 73 व्या वर्षी 27 जुलै 2021 ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. काही दिवसांनी पुढचे सोपस्कार पार पडले.

हे सुद्धा वाचा

नागपूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागाने डांगे यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र त्यांच्या नातेवाईकांना दिले. या गोष्टीला 17 महिने उलटून गेले होते. त्यांच्या आठवणींच्या स्मृती धूसर होत असतानाच त्यांच्या कुटूंबियांना धक्का देणारी एक माहिती समोर आली.

शिवाजी डांगे यांचा नातू निखिल याच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. तो मॅसेज पाहून मोबाईलवर धडकला आणि त्याची तारांबळ उडाली. शिवाजी डांगे यांच्या कोवॅक्सिनचा पहिला डोस यशस्वी झाला. त्याचे प्रमाणपत्र हवे असेल तर शासकीय संकेतस्थळावरून ते डाऊन लोड करा असा तो मॅसेज होता.

खरा धक्का तर पुढे होता. निखिल याने लगेच संकेतस्थळावर जाऊन डांगे यांचे ते प्रमाणपत्र तपासले. ते पाहून डांगे कुटुंबाला एकावर एक धक्के बसत गेले. नागपूर येथे राहणाऱ्या डांगे यांनी कोल्हापूर येथे जाऊन व्हॅक्सिनेशन घेतले होते.

2021 साली निदान झालेल्या डांगे यांचे प्रमाणपत्र १७ महिन्यानंतर कसे आले असा प्रश्न कुटुंबियांना पडला. निखाली याने यावर प्रतिक्रया देताना ‘नागपुरात मेलेल्या माणसाला व्हॅक्सिन स्वर्गात तर त्याचे प्रमाणपत्र कोल्हापुरात मिळालंय अशी खोचक प्रतिक्रिया दिली.