पालघर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनीही पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा असं आवाहन सरकारकडून करण्यात आहे. तर दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येत आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.(Health worker’s agitation at Palghar Collector office)
कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज पालघर जिल्हा युवा सुशिक्षित बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. या आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांचं वेतनच मिळालं नाही. इतकच नाही तर त्यांची अचानकपणे आरोग्य सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी महिन्याभरापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणही केलं होतं. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण सोडण्यात आलं. पण जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जव्हार इथे दिलेल्या आश्वासनाचीही पूर्तता केली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज शिवाजी चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
नागपूर मेडिकल कॉलेजमधील कोरोना बाधितांचा आकडा 38 झाला आहे. त्यात डेंटल महाविद्यालयातील 9, एमबीबीएसच्या 12, पीजी करणाऱ्या 9 आणि तीन स्टाफ नर्सचा समावेश आहे. त्यापैकी चार जणांना गृह विलगिकरनात ठेवण्यात आलं आहे. तर बाकी सगळ्यांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकजण हे लक्षण नसलेले आहेत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सुद्धा भरती करून घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कॉलेज सुरू झालं. त्यात वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी आले होते. त्यामुळे या ठिकाणी येऊन त्यांना संक्रमण झालं. आता खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्टेल सॅनिटाइझ करण्यात आलं आहे, अशी माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी दिली.
एकाच घरातल्या दहा जणांना कोरोना झाल्याच समोर आल्यानंतर अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील दहा जणांना कोरोनाची लागण झालीय. कुटूंबातील एक तरुण पुणे येथे काही दिवस गेला. पुण्याहून घरी आल्यावर त्यास ताप आल्यानंतर तपासणी केली असता कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर कुटूंबातील इतरांची तपासणी केल्यानंतर तरुणासह एकुण 10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
नागपूरच्या मेडिकल कॉलेजलाच कोरोनाचा विळखा; 30 डॉक्टर्स, तीन नर्स कोरोना पॉझिटिव्हhttps://t.co/xSFTzUrm29#Nagpur | #corona | #coronavirus | #coronavirusuk | #MaharashtraCoronaVirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
संबंधित बातम्या :
आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर
Health worker’s agitation at Palghar Collector office