Rain Alert : या विकेण्डला पुन्हा पावसाचे कमबॅक, येथे दमदार हजेरी

| Updated on: Jul 03, 2023 | 5:24 PM

गेल्याकाही दिवसांपासून मुंबईतील पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सोमवारी तर मुंबईत चक्क सुर्याचे दर्शन झाले. आता पुन्हा पावसाच्या सरींची बरसात होणार आहे. यंदाचा विकेण्ड पुन्हा जोरदार पावसाने साजरा होणार आहे. 

Rain Alert : या विकेण्डला पुन्हा पावसाचे कमबॅक, येथे दमदार हजेरी
mumbai rain alert
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : यंदाचा मान्सून उशीराने दाखल झाला आहे. देशभरात आता मान्सूनचा ( Monsoon ) पाऊस सुरु आहे. दरवर्षी नेमाने 6 जूनला मुंबईत दाखल होणार पावसाने यंदा बिपरजॉय चक्रीवादाळाच्या ( Biperjoy ) प्रभावाने जूनच्या अखेरच्या पंधरवड्यात हजेरी लावली. आता गेल्या तीन चार दिवसांपासून जरासी उसंत घेतल्यानंतर आता मुंबई आणि कोकणात ( Konkan ) पुन्हा एकदा पावासाची दमदार हजेरी होणार आहे. त्यामुळे या विकेण्डला मुंबई , ठाणे आणि कोकणात पावसाची जोरादार हजेरी होण्याचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे.

दरवर्षीपासून मान्सूनचे आगमन मुंबईत उशीरा झाले असले तरी देशभरात मात्र यंदा मान्सून सहा दिवस आधीच दाखल झाल्याचा हवामान खात्याचे म्हणणे आहे. अनेक वर्षांनी यंदा प्रथमच मुंबई आणि दिल्लीत एकाच वेळी मान्सूनचे आगमन झाले आहे. आता मुंबई आणि कोकणात मान्सूनचा 25 जूनपासून जोरदार आगमन झाले. त्यानंतर गेल्याकाही दिवसांपासून मुंबईतील पावसाने जरा विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सोमवारी तर मुंबईत चक्क सुर्याचे दर्शन झाले. आता पुन्हा पावसाच्या सरींची बरसात होणार आहे. यंदाचा विकेण्ड पुन्हा जोरदार पावसाने साजरा होणार आहे.

IMD चा चार्ट पाहा..

आता ठाण्यात पुढील पाच दिवसात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत विकेण्डला बुधवार, गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार पर्जन्यवृष्टीचा यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. तर रायगड आणि रत्नागिरीत अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत उद्या मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची अंदाज असून गुरुवार आणि शुक्रवारी जोरदार सरी कोसळ्याची शक्यता असून यलोअलर्ट जारी केला आहे. रत्नागिरीत पुढील पाचही दिवस जोरदार पावसाची ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत पावसाचे पुन्हा आगमन होणार आहे.