मुंबई – मागच्या चार दिवसांपुर्वी महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain Maharashtra) झाला आहे. त्यावेळी अनेक जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. तसेच अनेक जिल्ह्यात पूराचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातल्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये एनडीआरएफ पथक पाठवण्यात आलं होतं. मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्रात विशाल पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) व्यक्त केली होती. त्यानंतर काही पावसाने उसंत घेतली. काल सायंकाळपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पुढच्या 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy Rain Mumbai) होण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला असून तिथेही अतिवृष्टी होण्याची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.
11 Jul,बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र,पश्चिम किनार्यावरील द्रोणिय स्थिती,20°N पूर्व-पश्चिम शियर,मान्सून ट्रफ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित;परिणामी ह्या ४-५ दिवसात कोकण (मुंबई ठाण्यासह),मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाउस,मराठवाड्यातही जोर pic.twitter.com/mYMZNxDk9U
हे सुद्धा वाचा— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 11, 2022
यावर्षी महाराष्ट्रात लवकर पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. परंतु पावसाची जोरदार सुरूवात मात्र जुलै महिन्यात झाल्याचं पाहायला मिळालं. जुन महिना संपला तरी पाऊस नसल्याने महाराष्ट्रात दुष्काळ पडतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मागच्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी मुंबईतल्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच विरार, वसई, पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणी पाहायला मिळतं होतं. पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे गरज असेल तरचं घरातून बाहेर पडा असं सांगण्यात आले आहे.
मुंबईत रात्रीपासून वाऱ्याचा वेग वाढला असून काही दिवस वाऱ्याचा वेग असाचं राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. मागच्या आठवड़्यात झालेल्या पावसामुळे मुंबईतले बसचे मार्ग बदलण्यात आले होते. पालघरमध्ये पुढील तीन दिवस दिवस, रायगडमध्ये दोन दिवस तर रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.