मुंबईः राज्यात आज ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असली राज्यात आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात दमदार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबाकडून (Regional Meteorological Center Colaba) काही जिल्ह्यात हलका, मध्यम, जोरदार आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे,मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. विदर्भातही आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या, धरणातून पाणीच पाणी झाले आहे.
9pm,पाऊस अपडेट्स: दक्षिण कोकण ते गोवा भागात सकाळपासून जोरदार ते अति मुसळधार पाऊस व तुरळक ठिकाणी अतीवृष्टी (>200 मिमी)झाली आहे. रत्नागिरीतील नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत. उपग्रह निरीक्षणावरून असे दिसते की कोकणात पुढील काही तास मध्यम ते तीव्र सरींची शक्यता.
काळजी घ्या. pic.twitter.com/vbedgQcCaH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 4, 2022
कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात उद्या आणि परवा हलक्या पावसाची शक्यता आहे.
तर येत्या 8 तारखेला मात्र या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, अहमदनगरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर ढगांच्या गडगडाटासह विजांसह जोरदार वारा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत, तर काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.