नवी मुंबई : नागपुरातील 125 वर्ष जुने श्रद्धानंद अनाथालयासाठी मुंबईतील दोन भाऊ-बहिणींनी पुढाकार घेतला आहे. कोविड काळात सर्वच हतबल झालेले असताना मदतीच्या जोरावर चालवण्यात येणारे वृद्धाश्रम, अनाथालयांची अवस्ताही बिकट आहे. या अनाथालयात असलेल्या 500 मुलांसाठी कोविड काळात मदत उभारावी या संकल्पनेनं नवी मुंबईतील सौरभ आणि सुरभी सरसावले आहेत. (Saurabh and Surabhi Mukherjee from Navi Mumbai raise funds for children at Shraddhanand Orphanage)
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य होत नाही. त्यामुळे निधी संकलनात अडथळे येत आहेत. हे जाणून सुरभी मुखर्जी आणि सौरभ मुखर्जी या भावंडांनी समाजमाध्यमांचा सुरेख वापर केलाय. त्यांनी लहान-लहान मुलांचा व्हिडीओ तयार करून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तो जनतेसमोर आणण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अनाथालयातील मुलांना मदत व्हावी, हा या मागील उद्देश आहे. सुरभी मुखर्जी, सौरभ मुखर्जी या दोन भावंडांनी या अनाथालयाला मदत करण्यासाठी आगळी वेगळी योजना आखली आहे.
सुरभी बारावीमध्ये आहे. ती कॅनकेज या एनजीओच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त मुलांना शिकवते. तर सौरभ हा फक्त दहावीचा विद्यार्थी आहे. यांच्यासह अदित्य चड्डा, करी हनसुतिया आणि इहा बूटी या मित्रांची साथही त्यांना लाभत आहे. नागपूरमधील श्रद्धानंद अनाथालयाबाबत त्यांना समजल्यावर सुरभी आणि सौरभ यांना अनाथलयाला मदत करण्याची कल्पना सुचली. ती अंमलात आणण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेतलं. या मुलांना आवश्यक असलेल्या गोष्टी मिळाव्यात, त्यांचं राहणीमान उत्तम असावं. त्याचबरोबर या मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम अनाथालयाच्या माध्यामातून राबविण्याची संकल्पना त्यांनी पुढे आणली. गेल्या चार महिन्यांपासून ते या कामाला लागले आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी वेगवेगळे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून अनाथालयातील मुलांसाठी मदतीची हाक दिली आहे.
सामाजिक भान जपत या मुलांनी अनाथालयातील लहान मुलांची मदत करायला निधी उभारण्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला आहे. यासंदर्भात श्रद्धानंद अनाथालयाच्या सचिव गीतांजली बूटी म्हणाल्या की समाजाचे आपण काही देणे लागतो. ही जाणीव असणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. निराधार मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी, त्यांच्यातील सृजनतेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम वेगळा ठरतो.
2 जुलै रोजी गुलदस्ता या विशेष कार्यक्रमाचं ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात अनेक लहानगे आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण इंस्टाग्रामवर @tulipartfoaundation, @saurav_fn. तर फेसबुकवर @shradhanandanathalaya, @tulipartfoundation वर केले जाणार आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी 350 रुपये फी ठेवण्यात आली आहे. या फीमधून उभा राहणारा निधी नागपूरच्या श्रद्धानंद अनाथालयातील मुलांसाठी वापरला जाणार आहे.
BANK DETAILS HDFC BANK
Ltd Account No: 50100402992348
RTGS/NEFT Code: HDFC0000102
Paytm /Google Pay: 9422810747
इतर बातम्या :
कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क, पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय
Saurabh and Surabhi Mukherjee from Navi Mumbai raise funds for children at Shraddhanand Orphanage