नाशिक : नाशिक महापालिकेतील स्थायी समितीवरुन शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या निकालाने शिवसेनेला लॉटरी लागली, तर भाजपला धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून मिळाली आहे. (High Court Slams BJP in Nashik Municipal Corporation relief to Shivsena)
भाजपचा एक सदस्य घटल्यामुळे स्थायी समितीवर असलेल्या भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. दोन नगरसेवक घटल्याने भाजपचे तौलनिक संख्याबळ आठच असण्याबाबत शिवसेनेने न्यायालयात धाव घेतली हाती. आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती भाजपने दिली.
तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समिती सदस्य नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने उच्च न्यायालयात तक्रार केली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेची सदस्य संख्या आता एकाने वाढणार आहे. सत्ताधारी भाजपला हायकोर्टाच्या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे.
नाशिक महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र नाशिक रोड प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भाजपचं संख्याबळही घटलं होतं.
तौलनिक संख्याबळाचा विचार करता स्थायी समितीत शिवसेनेचा एक सदस्य वाढला असल्याचा दावा केला जात होता. त्यातच महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या वर्षी स्थायी समितीवर भाजपच्या आठऐवजी नऊ सदस्यांची नियुक्ती केल्याचा दावा शिवसेनेने केला होता. यानंतर शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (High Court Slams BJP in Nashik Municipal Corporation relief to Shivsena)
नाशिक महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. आणखी एक वर्षाहून अधिक काळ निवडणुकीसाठी शिल्लक आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर करण्यासाठी आतापासूनच जातीने लक्ष घालायला सुरुवात केली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी यांच्याही बैठकांवर बैठका सुरु आहेत.
संबंधित बातम्या :
नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?
सानपांचा वचपा काढण्यासाठी राऊतांचा नाशिक दौरा; भाजपचे दोन बडे नेते फोडणार
(High Court Slams BJP in Nashik Municipal Corporation relief to Shivsena)