नाशिक : श्रद्धा वालकर या मुलीच्या घृणास्पद मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नाशिकमधील सर्व हिंदू संघटना एकवटल्या असून मुक मोर्चा आज शहरात काढण्यात आला आहे. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नाशिकमधील बी डी भालेकर मैदान येथून सुरुवात करण्यात आली होती. श्रद्धा वालकरच्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी करत लव्ह जिहादचा मुद्दा हाती घेऊन हिंदू संघटना एकवटल्या आहेत. नाशिकमधील हिंदू संघटना यांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून नाशिककरांनी सहभागी व्हावे अशी मागणी केली होती. त्यानुसार हिंदू संघटनांच्या विराट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात तपासाला गती देऊन लवकरात लवकर आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे. याशिवाय लव्ह जिहादची होणारी प्रकरणे थांबली पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी एकीकडे पोलिसांकडून तपास सुरू असतांना दुसरींकडे श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून भालेकर मैदान येथून मुक मोर्चा काढण्यात आला आहे.
श्रद्धा वालकर येथून सारखी दुसरी घटना घडल्यास आता मुक मोर्चा काढला आहे नंतर ठोक मोर्चा काढू अशीही भूमिका नाशिकमधील हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नाशिक शहरातील हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रित येत विराट मुक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देत सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात आक्रमक भूमिका घेऊ असाही इशारा दिला आहे.