मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : राज्यशासनाने भोजन पुरवठा करण्याची कंत्राटी काढली आहेत. यावर कायम माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आताही जे काही कंत्राटदार संबधित आहेत. काही यार कंपन्या आहेत यांच्यासाठी काढले आहेत. ज्यांना कंत्राट देण्यात आली ती क्रिस्टल कंपनी आणि ब्रिक्स कंपनी कोणाची आहेत ते सांगण्याची कष्ट सरकार घेईल का? असा उपरोधिक टोला शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला केलाय. ब्रिक्स कंपनीबाबत हसन मुश्रीफ यांना ईडीचा धाक दाखवला होता. व्हिडिओ स्पेशालिस्ट असणाऱ्या किरिट सोमया यांनी कोल्हापूरचे दौरे केले होते. ते यावर काही बोलणारे आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील भोजन पुरवठा योजनेमध्ये सातत्याने उणीवा येत आहेत. मग, असे ठेके देताना ते महिला बचत गटांना द्यायला काय अडचण आहे. महिलांना असे ठेके द्यायला हवेत अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. ससून हॉस्पिटल संदर्भात आम्ही मागणी केली होती. पण, आरोपील लेवीश लाईफ देण्याचा जो प्रयत्न केला. त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. संजीव ठाकूर यांच निलंबण केलं. पण अटक झाली नाही. डीन ठाकूर यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.
छगन भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. मराठा बांधवाना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. पण. भाजप महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी हिंदू – मुस्लिम हा डाव फसला. म्हणून हा नवीन डाव आहे. दुष्काळ किंवा इतर प्रश्न असतील त्यावरून लक्ष हटावे म्हणून जातीजातीत तंटे निर्माण केले जात आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.
खासदार हेमंत पाटील यांनी स्टंटबाजी करत राजीनामा वायरल केला. पण, लोक सुजाण आहेत. ‘ये पब्लिक हे ये सब जाणती हे’, असा टोला त्यांनी लगावला. एकीकडे टीम देवेंद्र यांची स्लीपर सेल म्हणतात, न्यायाधीश पाठवण्याचा निर्णय फडणवीस यांचा होता. तर, भुजबळ वेगळं म्हणतात त्यांच्या टॉम अँड जेरीच्या खेळात मला जास्त काही बोलायचं नाही, असा टोला त्यांनी लगावला.