Hingoli Crime : विवाहितेवर अत्याचार आणि धमकी प्रकरणी नगराध्यासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल

| Updated on: Apr 09, 2022 | 1:34 AM

हिंगोली शहरातील वंजारावडा भागात राहणाऱ्या रोहन बाबाराव बांगर याने 13 जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2022 दरम्यान पीडित विवाहितेचे तोंड बांधून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तर बापाने या गैरकृत्यावर पांघरुन घालण्याच्या उद्देशाने या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केलीस तर आमची बदनामी होईल, कोणाला सांगशील तर तुला खतम करून टाकतो अशी धमकी दिली होती.

Hingoli Crime : विवाहितेवर अत्याचार आणि धमकी प्रकरणी नगराध्यासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल
विवाहितेवर अत्याचार आणि धमकी प्रकरणी नगराध्यासह त्याच्या मुलावर गुन्हा दाखल
Image Credit source: TV9
Follow us on

हिंगोली : हिंगोली नगर पालिकेच्या भाजपाच्या माजी नगराध्यक्षाच्या मुलावर अत्याचार (Abused) केल्याप्रकरणी तर घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून पीडितेला धमकावल्या प्रकरणी माजी नगराध्यक्षवर गुन्हा (Case) दाखल झाला आहे. बाबाराव बळीराम बाबर आणि रोहन बाबाराव बांगर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत. हिंगोली शहर पोलिस ठाण्यात या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हिंगोलीच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. (Filed a case against the ex mayor and his son in a case of atrocities against a married woman)

घडल्या प्रकारची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली

हिंगोली शहरातील वंजारावडा भागात राहणाऱ्या रोहन बाबाराव बांगर याने 13 जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2022 दरम्यान पीडित विवाहितेचे तोंड बांधून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तर बापाने या गैरकृत्यावर पांघरुन घालण्याच्या उद्देशाने या प्रकाराबाबत कुठे वाच्यता केलीस तर आमची बदनामी होईल, कोणाला सांगशील तर तुला खतम करून टाकतो अशी धमकी दिली होती. याप्रकरणी भाजपा माजी नगराध्यक्ष बाबाराव बळीराम बांगर आणि मुलगा रोहन बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरा आपल्याला सासरी घेऊन जाईल या आशेने या घटनेची वाच्यता केली नाही. मात्र अद्याप आपल्याला सासरी घेऊन जायला कोणीही आले नाही. त्यामुळे मी गुन्हा दाखल करत असल्याचे पीडित विवाहितेने फिर्यादित म्हटले आहे. (Filed a case against the ex mayor and his son in a case of atrocities against a married woman)

इतर बातम्या

Wardha Suicide : एमपीएससी परीक्षेतील अपयशामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील शिपायाची गळफास घेत आत्महत्या

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय : उद्धव ठाकरे