हिंगोली : हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय. सेनगावात नव्याने उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये दोन्ही डॉक्टरांची डिग्रीच बोगस असल्याची तक्रार डॉक्टरांच्याच (Complaint against doctors) निमा संघटनेने हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजलीये. हिंगोली जिल्ह्यात जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला जातोय. सेनगावात काही दिवसांपूर्वी आमदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे नाव पत्रिकेवर छापून हृदयेश नावाच्या हॉस्पिटलचे थाटात उदघाटन झाले. येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण या रुगणालयात असणाऱ्या दोन्ही डॉक्टरांच्या डिग्रीच बोगस असल्याची तक्रार डॉक्टरांच्या निमाने (नॅशनल इन्ट्रीग्रेटेड मेडिकल असोसिएशन) हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय. या रुगणालायच्या डॉ. ज्ञानबा टेकाळे आणि डॉ. माधव रसाळ यांनी राज्य व केंद्राच्या वैद्यकीय परिषदेचे (mcim/ccim) बोगस प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आलाय. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या आरोग्य वर्तुळात एकच खळबळ माजलीये.
हृदयेश हॉस्पिटलमध्ये डॉ. ज्ञानबा टेकाळे आणि डॉ. माधव रसाळ ह्या दोन डॉक्टरांनी B.A.M.S. (pgdems) जनरल फिजिशियन अँड सर्जनचे बोगस प्रमाणपत्र आणल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत रुग्णांना सलाईन इंजेक्शन टोचत असल्याचा आरोप महाराष्ट्र कौसिल ऑफ इंडियन मेडिकल मुंबईचे नोंदणी अधिकारी डॉ. दिलीप वांगे यांनी केलाय. महाराष्ट्र कौन्सिलकडे या डॉक्टरांचे रजिस्ट्रेशनच नसल्याचं धक्कादायक वास्तव यातून पुढे आलंय.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकलने केलेले गंभीर आरोप या डॉक्टरांनी फेटाळून लावलेत. सेनगाव येथील हे दोन्ही डॉक्टरांनी आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचं म्हटलंय. आम्ही छत्तीसगढ वरून डिग्री मिळविली असून या डिग्रीच्या आधाराने आम्ही प्रॅक्टिस करीत आहोत. या संघटनांनी केलेले आरोप चुकीचे असून आपण कोणतेही पुरावे देण्यास तयार आहोत, असंही माधव रसाळ यांनी म्हटलंय.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असलेल्या विषयावर जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनाही टीव्ही 9 मराठीनं विचारणा केली. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी आरोग्यविभाग याची गांभीर्याने दखल घेईल, असं म्हटलंय. बोगस डॉक्टर जिल्ह्यात सक्रिय असतील तर समितीची बैठक घेऊन कार्यवाहीचे आदेश देऊ, असंही त्यांनी म्हटलंय. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व बोगस डॉक्टरांची पाहणी करणार असल्याचं जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटलंय.
निमा सारख्या डॉक्टरांच्याच संघटनेने दोन डॉक्टरांविरोधात तक्रार केल्याने बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे विलंब न लावता या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज निर्माण झाली आहे,या प्रकरणात आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झालीये.
दरम्यान, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बोगस डॉक्टर सक्रिय असून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. तसंच लोकांनीही अशा डॉक्टरांपासून सावध राहायला हवं, असंही आवाहन त्यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केलंय.