हिंगोली : मागील आठवड्यात राज्यातील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे मोठा फटका बसला होता. हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतीचे पाहणीही केली होती. त्यावेळीही त्यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याचे अश्वासन दिले होते तर आजही ते हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी देशाच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा असतो सांगत पुन्हा एकदा मदत देण्याची अश्वासन दिले आहे.
तर यावेळी त्यांनी राष्ट्र आणि महाराष्ट्रसाठी साऱ्यांनी एकत्र येऊन मदत करणे, राज्याचा विकास साधणं महत्वाचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे कृषी मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून झाल्यानंतर त्यांनी हिंगोलीतील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमाच्य ठिकाणीही त्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी त्यांनी मेळाव्यातील शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, माझ्या नावात सत्तार आहे. कोणाचीही सत्ता आली की, आपण पक्के असं म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हाश्या पिकाला.
यावेळी अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, जेव्हा राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या गोष्टी असतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे.
शेतकऱ्यांची क्रांती घडवायची असेल आणि शेतकऱ्याला मदत करायची असेल तर राज्याची तिजोरी असो किंवा केंद्राची तिजोरी असो यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो तो शेतकऱ्याचा. त्यामुळे केंद्राच्या तिजोरीचा वाटा हा शेतकऱ्यांच्या वाट्याला जायला हवा असंही त्यांनी यावेळी सांगितले.
अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले की, कृषी मंत्री म्हणून माझी हिच भावना राहिल की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल.
यावेळी त्यांनी आपल्या मंत्रीपदापर्यंच्या प्रवासाचीही माहिती त्यांनी सांगितली. मी तुमच्या सारखाच एक सामान्य कुटुंबातून आलो आहे. पण माझी बॅटरी चार्ज केली आणि मी इथंपर्यंत पोहचलो आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात अनेक अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, पुढच्या सहा महिन्यात सर्व पदे भरले जातील.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचेही कौतूक करत म्हणाले आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना,ही पदं रिक्त असल्याने त्यांना चिंता लागली आहे. त्यामूळे त्यांची दाढी वाढली आहे. ये जमाना दाढी वालेंका हैं असं म्हणताच मात्र पुन्हा एकदा हशा पिकला आहे.