Video : हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले; जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी, मराठवाड्यात महापूर

| Updated on: Sep 02, 2024 | 10:20 AM

Hingoli Flood : मराठवाड्यात महापूर आलाय. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले आहेत. जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. लोकांची घरं पाण्याखाली गेलीत. तर जनावरं पाण्यात उभी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वाचा सविस्तर...

Video : हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले; जनावरांच्या गळ्यापर्यंत पाणी, मराठवाड्यात महापूर
हिंगोलीत पूर
Image Credit source: tv9
Follow us on

जो मराठवाडा कायम दुष्काळाच्या झळा सोसतो तो मराठवाडा आज पुराच्या पाण्यात अडकलाय. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होतोय. या पावसामुळे नद्यांना पूर आलाय. गावं पाण्याखाली गेली आहेत. 40 शेतकरी रात्री पुरात अडकले आहेत. कळमनुरी तालुक्यातील देवजना गावात काही शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. कालपासूनच या भागात जोरदार पाऊस कोसळतोय. ठिकठिकाणी पाणी साचलंय. तर काही गावांमध्येदेखील हे पाणी शिरलं आहे. काल रात्रीपासून देवजना गाव पाण्याखाली आहे. 40 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडलेत.

हिंगोली जिल्ह्यात पूर, 40 जण अडकले

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. यात 40 शेतकरी अडकलेत. रात्रीपासूनच पाण्याची पातळी वाढत आहे. लोकांची घरं पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे घराच्या छतावर जात नागरिकांनी बचाव केलाय. मात्र जनावरं घराच्या खालीच आहेत. जनावरं रात्रभर पाण्यात उभी आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आम्हाला या पूराच्या पाण्यातून बाहेर काढाच पण आमची जनावरं देखील वाचली पाहिजेत. त्यांनाही सुरक्षित ठिकाणी नेलं पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी टीव्ही 9 मराठीवर याबाबतची प्रतिक्रिया दिली. दोन दिवस हिंगोलीत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पूर आल्याची परिस्थिती आहे. काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. काही ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं गेलं आहे. देवजना गावातील लोकांनाही बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं गोयल म्हणाले. तर जनावरांना बाहेरबाबत प्रशासनाच्या काय हालचाली सुरु आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आधी लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मग जणावरांबाबत आम्ही निर्णय घेऊ, असं अभिनव गोयल म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्येही मुसळधार पाऊस

तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहेगाव बंगला या गावात पुराचं घुसलं आहे. पावसाचं पाणी गावातील अनेक घरांमध्ये घुसलं आहे. पावसाचे पाणी शाळा जिम वाचनालयातही पावसाचं पाणी घुसलंय. पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे गावातल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दहेगाव बंगला या गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिक हैराण झालेत.