कोल्हापूरः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणावरून आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असा दावा अजित पवार यांनी केला. त्यानंतर भाजपसह शिंदे गटातील काही नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याविषयावर इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी इतिहास आणि बखर वाङ्मयातील दाखले देत संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणायचे की नाही आणि त्यांना धर्मवीर ही पदवी नेमकी कशी मिळाली यावर त्यांनी संदर्भ देत इतिहासातील दाखले दिले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे यांना धर्मवीर न म्हणता त्यांना स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
त्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी बोलताना इतिहासातील बखरकारांनी मांडलेला इतिहास आणि इतिहासात छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या बदनामीचे कसे षडयंत्र रचले गेले तेही त्यांनी बखर, नाटकांचा संदर्भ देत सांगितले.
छत्रपती संभाजीराजे यांनी शिवछत्रपती ही त्यांनी लावून घेतलेली पदवी होती. शिवाजी महाराजांना एका धर्माचे रक्षक म्हणून पुढं आणणे चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. संभाजीराजे हे धर्मवीर होते, मात्र त्यांना कोणता धर्म अपेक्षित होता हे माहिती करून घेणेही महत्वाचे आहे.
इतिहासातील समकालीन साधनातून मराठाधर्म, महाराष्ट्रधर्म हा अपेक्षित होता. त्यामुळे महाराष्ट्र धर्माबरोबर हिंदू धर्म नव्हता असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कारण त्याकाळी मिर्जाराजा जयसिंगसारख्या हिंदू राजानेही त्याकाळी स्वराज्यावर चालून आलेले अनेक हिंदू राजे होते.
त्यामुळे एका धर्मासाठी संभाजीराजे यांना पुढं आणणं चुकीचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. जेधे शेखावली, महाराष्ट्र धर्मासाठी एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते.
छत्रपती संभाजीराजे यांना बदनामी करणारे विशिष्ट केंद्र आहेत. त्यांच्याकडूनच ही बदनामी सुरू झाली आहे असा जोरदार हल्लाबोल इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.
अण्णाजी दत्तो, विनायक दामोदर सावरकर, गोळवळकर यांनी आपल्या साहित्यातून अपमानस्पद आणि बदनामी करणारी विशेषणं लावली आहेत.
मराठीतील ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनीही बदनामी करणारी विशेषणंच संभाजीराजे यांना लावली आहेत. त्यामुळे संभाजीमहाराज यांची बदनामी करणारे कोणी मुस्लमान होते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
इतिहाससंशोधक वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी संशोधन करून छत्रपती संभाजीराजे यांची व्यक्तिमत्व तळपत्या तलवारीच्या पात्यासारखं होतं असं चित्र या इतिहासकारांनी संशोधनाच्या माध्यमातून उभी केली आहेत.