दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : गावचा नेता किंवा एखाद्या पुढऱ्याचा वाढदिवस असेल तर चौकाचौकात बॅनर लावले जातात, मोठा केक आणलाही जातो, हजारो लोकांच्या उपस्थित वाढदिवस साजरा केला जातो. डीजे, जेवणावळी उठतात. पण औरंगाबाद मध्ये एका आगळावेगळ्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आले होते. ज्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. औरंगाबाद शहरात चक्क एका मालकाने रेडयाचा जंगी वाढदिवस साजरा केला आहे. विशेष म्हणजे चौकाचौकात होर्डिंग लावून वाढदिवसाचे आमंत्रण दिले होते. रेडयाच्या वाढदिवसाला जवळपास 700 लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये सर्वांना जेवणही ठेवण्यात आले होते. नेत्यापेक्षाही रेडयाचा मोठा वाढदिवस साजरा झाल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यावेळी रेडयाच्या वाढदिवसाला ड्रायफ्रूटचा केक आणण्यात आला होता. यावेळी केक कापत पैशाची उधळण करत हा आगळावेगआला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. औरंगाबाद मधील वाढदिवस साजरा झालेल्या रेडयाचे नाव सुरज आहे. शंकरलाल पहाडिया हे या रेडयाचे मालक असून त्यांनी सूरजच्या वाढदिवसाचे जंगी स्वागत केले आहे.
औरंगाबाद साजरा झालेल्या सूरज नावाच्या रेडयाची जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये विशेष रेड्याच्या खानपाणाला दर महिन्याला बारा हजार रुपये खर्च येतो ही बाबही समोर आली आहे.
औरंगाबाद येथे पार पडलेल्या रेडयाच्या वाढदिवसाची चर्चा होणे स्वाभाविक आहे, नेत्याच्या वाढदिवसाला सुद्धा इतकी मोठी गर्दी नसेल इतकी गर्दी सूरजच्या वाढदिवसाला होती.
विशेष म्हणजे चौकाचौकात बॅनरबाजी करून निमंत्रण आणि 700 हून अधिक लोकांना जेवण, याशिवाय वाढदिवसासाठी खास ड्रायफ्रूटसचा केक ऑर्डर करण्यात आला होता.
शंकरलाल पहाडिया या रेडयाच्या मालकाने सूरज नावाच्या रेडयाचा जंगी वाढदिवस केल्याने रेडयाचा वाढदिवसच औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे.