15 जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाळासाहेब थोरातांची सूचना

| Updated on: May 22, 2021 | 6:03 PM

15 जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी होम आयसोलेशन बंद करण्याची सूचना थोरात यांनी दिलीय.

15 जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत बाळासाहेब थोरातांची सूचना
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
Follow us on

सोलापूर : राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील 15 जिल्ह्यात कोरोनाचा संकट अद्यापही कायम आहे. या 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी या 15 जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी होम आयसोलेशन बंद करण्याची सूचना थोरात यांनी दिलीय. तशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. (Home isolation likely to be closed in 15 districts of the state including Solapur)

राज्यात 15 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरुच आहे. त्यामुळे या 15 जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशन बंद करुन त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार केले जावेत, अशी सूचना थोरात यांनी दिली आहे. थोरात यांच्या सुचनेनुसार सोलापूर जिल्ह्यातील होम आयसोलेशन बंद करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. फक्त अपवादात्मक स्थितीतच होम आयसोलेशनला परवानगी दिली जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी दिल्यानंतर काही रुग्ण योग्य खबरदारी न घेता, नियमांचं उल्लंघन करुन बाहेर फिरत असल्याचं आढलून आलं आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक रुग्णावर करडी नजर ठेवणं प्रशासनाला अशक्य असल्याचं मिलिंद शंभरकर म्हणाले. त्यामुळे जिल्ह्यात आता होम आयसोलेशन बंद करुन रुग्णाला गावातील वा गावा जवळच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

ते 15 जिल्हे कोणते?

बुलढाणा

कोल्हापूर

रत्नागिरी

सांगली

यवतमाळ

अमरावती

सिंधुदुर्ग

सोलापूर

अकोला

सातारा

वाशीम

बीड

गडचिरोली

अहमदनगर

उस्मानाबाद

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही- डॉ. लहाने

म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो. पण तो हवेतून पसरतो असं म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसल्याचं डॉ. लहाने यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या 800 केसेस आहेत. 110 ठिकाणी म्युकरच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्य सरकारनं म्युकरमायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवलं आहे. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचं वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिलीय.

सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बाहुबली पाटील हे मिरज तालुक्यातील टाकळी येथे राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची आई एका नातेवाईकाची तब्ब्येत बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी गेल्या होत्या. तो नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह होता. ही माहिती बाहुबली यांच्या आईपासून लपवण्यात आली. बाहुबली यांची आई घरी परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ बाहुबली पाटील त्यांची पत्नी, दोन काका आणि चुलत भाऊ अशा घरातील संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. या कुटुंबाला सुरुवातील सौम्य लक्षण होती. त्यामुळे ते घरीच उपचार घेत होते. मात्र काही दिवसांनी बाहुबली पाटील यांच्यासह कुटुंबाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्या सर्वांना कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित बातम्या :

Mucormycosis | पुण्यात म्युकरमायकोसीसचे 20 बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?

PHOTOS : नवी मुंबईत कोव्हीड सेंटरमध्ये ग्रंथालय, कोरोना रुग्णही पुस्तकं वाचण्यात दंग

Home isolation likely to be closed in 15 districts of the state including Solapur