पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा, ‘या’ चार मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची साधणार संवाद

| Updated on: Sep 24, 2024 | 1:59 PM

लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा, या चार मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची साधणार संवाद
Follow us on

Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासाआघाडी अशी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच फटका बसला होता. आता याच पार्श्वभूमीवर भाजपने योग्य ती खबरदारी घेणं सुरु केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

अमित शाह हे आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौरा करणार आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. तसेच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, यासाठी अमित शहा हे आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

अमित शाह हे आज नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर रात्री उशिरा संभाजीनगरमध्ये पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर बुधवारी ते नाशिक आणि कोल्हापूरमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील, अशी माहिती समोर आली आहे. या दोन्हीही भेटीत अमित शाह हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतील.

अमित शाह विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चारही ठिकाणी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, जिल्ह्यातील नेते, बूथ पातळीवरील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. साधारण दोन हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. अमित शाह यांच्या नागपूर दौऱ्याच्या निमित्ताने विदर्भातील सर्वच विधानसभा पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक बोलवण्यात आली आहे. साधारण 1500 पेक्षा जास्त पदाधिकारी या बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत. या बैठकीत आजी-माजी खासदारांचा समावेश असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही महाराष्ट्र दौरा

या बैठकीत विदर्भात लोकसभा निवडणुकीत भाजपला कमी मताधिक्य मिळालं होतं, त्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असणार ही अतिशय महत्त्वाची बैठक मानली जात आहे. विधानसभा निवडणुकांना कशाप्रकारे समोर जायचं? विरोधकांना कशाप्रकारे उत्तर द्यायचं, यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते अनेक विकास कामांचे उद्धाटन करणार आहेत.