नाशिक : यंदाच्या वर्षी नाशिककरांवर ( Nashik News ) करवाढ केली जाईल अशी चर्चा असतांना प्रशासकीय राजवटीत नाशिक महानगर पालिकेने ( Nashik Municipal Corporation ) अप्रत्यक्षपणे करवाढीचा वरवंटा फिरवला आहे. नाशिक महानगर पालिकेच्या वतिने नव्या आर्थिक वर्षापासून नळ कनेक्शनच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. अर्धा इंचाच्या नळ जोडणी करिता शुल्काच्या पाच पट वाढ करण्यात आली आहे. तर बिगर घरघुती शुल्कात दहा पट आणि व्यावसायिक बांधकामकरिताच्या शुल्कात पंधरा पट वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी अडीचपट अनामत रक्कम भरण्याची अटही लावण्यात आली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे नाशिककरांवर करवाढ करण्यात आल्याचं दिसून येत आहे.
नाशिक महानगर पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. त्यामध्ये करवाढ होण्याची शक्यता नव्हती. त्याचे कारण म्हणजे मागील दोन वर्षापूर्वीही करवाढ करण्यात आली होती. त्यामुळे करवाढ होणार नसल्याने नाशिककरांना दिलासा मिळणार होता.
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढ केली होती. त्यावरून संपूर्ण नाशिकमध्ये ठिकठिकाणी आंदोलन झाली होती. सत्ताधारी भाजपनेच त्यांना विरोधही केला होता. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एक लाट निर्माण झाली होती.
त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेले रमेश पवार यांनीही करवाढ करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या होत्या मात्र त्यानंतर त्यांचीही वर्षभराच्या आतच बदली करण्यात आली होती. त्यानंतर आयुक्त तथा प्रशासक म्हणून चंद्रकांत पूलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
असे असतांना विद्यमान प्रशासक डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी नळ जोडणी शुल्कात वाढ केली आहे. त्यामध्ये फेरूल अर्धा इंचीची नळजोडणी करिता 250 रुपये लागणार आहे. एक इंची साठी आता पाचशे रुपये घेतले जाणार आहे.
तर घरगुती करिता अर्धा इंची जोडणीला 200 रुपये ऐवजी 500 रुपये द्यावे लागणार आहे. तर एक इंचीसाठी 800 रुपये ऐवजी दोन हजार रुपये द्यावे लागणार आहे. एकूणच दुप्पट रक्कम आता मोजावी लागणार आहे.
दरम्यान बिगर घरगुती म्हणजे व्यावसायिक बांधकामासाठी फेरुल जोडणी शुल्क दहापट आणि अनामत रक्कम देखील पाच पटीने वाढवली आहे. अर्धा इंची साठी 750 रुपये, एक इंची साठी 1500 रुपये मोजावे लागणार आहे.
याशिवाय कायमस्वरूपी व्यावसायिक बांधकामांची अर्धा इंची करीता दोन हजार मोजावे लागणार आहे. एक इंची करीता दहा हजार रुपये भरावे लागणार आहे. इतकच काय तर प्लंबिंग लायसन्स शुल्कही चौपट वाढविण्यात आले आहे.
नवीन कुणाला प्लंबिंग लायसन्स घ्यायचे असल्यास एक हजार रुपये द्यावे लागणार आहे. याशिवाय परवाना रक्कम ही तीन हजार रुपये द्यावी लागणार आहे. आणि नूतणीकरण रक्कमही एक हजार आणि विलंब झाल्यास अतिरिक्त एक हजार असे पैसे मोजावे लागणार आहे.
याशिवाय टँकर द्वारे केला जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात तीन पटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याच्या संदर्भात मोठी करवाढ झाल्याचे
टँकरद्वारे केला जाणाऱ्या पाणी पुरवठा दरातही तीन पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत अप्रत्यक्षपणे करवाढीचा वरवंटा फिरवला गेल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.